Crime: अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ, आत्महत्या की घातपात? तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:03 IST2025-11-14T12:01:41+5:302025-11-14T12:03:13+5:30
Five of family found dead In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात एकाच कुटुंबातील पाच जण कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ माजली.

Crime: अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ, आत्महत्या की घातपात? तपास सुरू
उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. आज (शुक्रवारी, १४ नोव्हेंबर) सकाळी इकौना परिसरातील कैलाशपूर ग्रामपंचायतीच्या लियाकत पूर्वा गावात एका जोडप्यासह कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली. घटनची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्वाचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. या कुटुंबाने आत्महत्या केली की त्यांच्यासोबत घातपात झाला? यामागचे कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच समोर येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांचे घर गेल्या काही दिवसांपासून आतून बंद असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी बाहेरून आवाज दिला असताना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घराचा दरवाजा तोडला असताना पती-पत्नीसह कुटुंबातील पाच सदस्य मृतावस्थेत आढळले. या घटनेमुळे परिसरात शोक आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राहुल भाटी यांनी तातडीने मोठ्या पोलिस दलासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. हे पथक घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करत आहे.
अधिकाऱ्यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले असून, प्रत्येक संभाव्य कोनातून तपासणी सुरू आहे. पोलिसांनी घर सील केले आहे आणि या दुःखद घटनेच्या प्रत्येक पैलूची चौकशी करत आहेत. सध्या या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही आणि पोलिस तपासणीनंतरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.