दोन मुली एकाच मुलाच्या पडल्या प्रेमात, कुटुंबीय अडथळा ठरत असल्याने गेले पळून, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 15:32 IST2024-10-22T15:31:44+5:302024-10-22T15:32:20+5:30
Uttar Pradesh News: अल्पवयीन मुलां-मुलींमधील प्रेमप्रकरणाच्या घटना मागच्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यामधून अल्पवयीनांच्या प्रेमप्रकरणाबाबतची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दोन मुली एकाच मुलाच्या पडल्या प्रेमात, कुटुंबीय अडथळा ठरत असल्याने गेले पळून, अखेर...
अल्पवयीन मुलां-मुलींमधील प्रेमप्रकरणाच्या घटना मागच्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यामधून अल्पवयीनांच्या प्रेमप्रकरणाबाबतची धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली एकाच अल्पवयीन मुलासोबत फरार झाल्या. त्यानंतर या मुलींच्या कुटुंबीयांपैकी एकाने पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीनांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोरखपूरमधील शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानसनगर येथील राहणाऱ्या एकमेकींच्या मैत्रिणी असलेल्या दोन मुली एका मुलासोबत घर सोडून पळून गेल्या. यापैकी एक मुलगी दूध आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली. मात्र ती परत घरी आलीच नाही. त्यामुळे चिंतीत झालेल्या तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता त्याच भागात राहणारी आणखी एक मुलगी बेपत्ता झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सर्व्हिलान्स आणि सीडीआरच्या माध्यमातून तपास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोन अल्पवयीन मुली ह्या एका अल्पवयीन मुलासोबत पळून गेल्याचं समोर आलं.
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मुली एकाच तरुणावर प्रेम करत होत्या. त्यामुळेच तिघेही एकत्र राहू इच्छीत होते. मात्र कुटुंबीय विरोध करतील भीतीने या तिघांनीही घर सोडून पळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पळून गेलेल्या एका मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सीडीआर आणि सर्व्हिलान्स यांच्या मदतीने या तिघांनाही बिहारमधील हथुआ येथून ताब्यात घेतला. त्यानंतर दोन्ही मुलींना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. तर अल्पवयीन मुलाविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.