"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:00 IST2025-09-30T16:00:07+5:302025-09-30T16:00:45+5:30
Yogi Adityanath on I Love Muhammad: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या दंगेखोरांना सज्जड शब्दात दम दिला आहे. योगींनी 'आय लव्ह मोहम्मद' निदर्शनावरही भाष्य केले आहे.

"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
Yogi Adityanath Latest Speech: "काही लोक भारतात राहतात पण 'गजवा ए हिंद'चा नारा देत इथे देशविरोधी कृत्यांना प्रोत्साहन दे आहेत. विरोधी कार्य करत आहेत. भारत भूमिमध्ये गजवा ए हिंद चालणार नाही. ज्यांना नरकात जायचं आहे, त्यांनी गजवा ए हिंदच्या नावावर अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा", अशा शब्दात मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी दंगेखोरांना इशारा दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उत्तर प्रदेशचेमुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी बलरामपूरमध्ये ८२५ कोटी रुपयांच्या १२४ विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलतानाच, दंगलखोरांनाही मेसेज दिला. लवकरच देवीपाटन मंडळाला क्रीडा महाविद्यालय (स्पोर्ट्स कॉलेज) देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
'गजवा-ए-हिंद' आणि दंगलखोरांवरबद्दल योगी काय बोलले?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, भारतभूमिमध्ये गजवा ए हिंदची कल्पना चालणार नाही. असे स्वप्न बघणाऱ्याचेही नरकाचे तिकीट काढले जाईल. त्यामुळे ज्यांना नरकात जायचं, त्यांनी अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करून करावा. जे लोक शांतता आणि विकासाचा विरोध करतात, त्यांना सरकार कठोरपणे उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले.
बरेलीतील हिंसाचाराचा उल्लेख करत मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, "जेव्हाही तुम्ही हिंमत कराल, तेव्हा बरेलीमध्ये जसा मार दिला गेला, त्याचप्रमाणे इथेही चोप दिला जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांवर आणि दंगली भडकावणाऱ्यांवर 'डबल इंजिन सरकार'ची नजर आहे."
विकास योजना आणि बलरामपूरचे कनेक्शन
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बलरामपूरबद्दल सांगितले की, बलरामपूर हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि नानाजी देशमुख यांची कर्मभूमी आहे. अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा बलरामपूरमधूनच निवडून संसदेत पोहोचले होते, त्यामुळे त्यांच्या नावाने येथे लवकरच मेडिकल कॉलेज सुरू होईल. तसेच, गोंडा, बहराइच आणि बलरामपूरमध्ये तीन मेडिकल कॉलेजचे काम सुरू असून, श्रावस्तीमध्ये महात्मा बुद्ध यांच्या नावाने विमानतळही तयार होत आहे.
"आधीच्या उत्तर प्रदेशातील सरकारांनी प्रत्येक जिल्ह्यात एक माफिया तयार केला, तर आमच्या सरकारने 'एक जिल्हा, एक उत्पादन' आणि 'एक जिल्हा, एक मेडिकल कॉलेज' ही योजना आणली आहे. बलरामपूरला विकसित उत्तर प्रदेशसाठी आत्मनिर्भर आणि विकसित करणे गरजेचे आहे, असेही आदित्यनाथ म्हणाले.
अफवा आणि दहशत पसरवणाऱ्यांची माहिती द्या
अफवा पसरवणारे, ड्रोन आणि चोरीच्या नावावर दहशत निर्माण करणाऱ्यांनाही योगी आदित्यनाथ यांनी इशारा दिला.
"प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे आणि पोलिसांनी गस्त वाढवली आहे. दहशत पसरवणाऱ्यांवर गैंगस्टर ॲक्टनुसार कारवाई करण्याचे आणि त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा लोकांपासून नागरिकांनी सावध राहावे आणि प्रशासनाला माहिती द्यावी", असे आवाहन त्यांनी केले.
योगींच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश आणि प्रमाणपत्रांचे वाटप
या कार्यक्रमात, मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांनी पंचायत कल्याण निधी, मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान, एनआरएलएम, पीएम स्वनिधी योजना आणि मुख्यमंत्री आपत्ती मदत निधी योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी, उत्तर प्रदेशला विकसित करण्यासाठी नागरिकांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन करत, यासाठी समर्थ उत्तर प्रदेश पोर्टलवर सूचना देण्यास सांगितले.