घराला बाहेरून कुलूप, आत ५ जणांचा कोळसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 06:13 IST2024-01-29T06:12:47+5:302024-01-29T06:13:41+5:30

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बरेली येथे रविवारी कुटुंबातील पाच जणांचा घराला आग लागल्याने मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे.    घराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते.

The house is locked from outside, coal for 5 people inside | घराला बाहेरून कुलूप, आत ५ जणांचा कोळसा

घराला बाहेरून कुलूप, आत ५ जणांचा कोळसा

बरेली - उत्तर प्रदेशातील बरेली येथे रविवारी कुटुंबातील पाच जणांचा घराला आग लागल्याने मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. 
  घराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. बाहेरून कुलूप कोणी लावले, त्याचा तपास करण्यात येत आहे. धुरामुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे. मात्र, पोलिस अन्य बाजूंनीही तपास करत आहेत.
मृतांमध्ये अजय गुप्ता, त्याची पत्नी अनिता आणि दिव्यांश (९), दिव्यांग्या (६) आणि लहान मुलगा दक्ष (३) यांचा समावेश आहे. रात्री कुटुंब खोलीत झोपले असता खोलीत हीटर सुरू असल्याचेही समोर येत आहे. सकाळी शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने दरवाजा बंद असल्याचे पाहिले. घरातून धूर निघत होता. पोलिसांनी दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढले.

Web Title: The house is locked from outside, coal for 5 people inside