भयानक! नवरा-नवरी पहिल्या रात्री छतावर झोपले, मोठ्या दीराने संपविले; पाच जणांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 09:45 IST2023-06-24T09:43:11+5:302023-06-24T09:45:54+5:30

शिववीर हा नोएडामध्ये कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र चालवत होता. शुक्रवारी त्याच्या लहान भावाची सोनूची वरात इटावाहून आली होती.

Terrible! The new wed couple slept on the roof for the first night, man killed Five people with them UP Crime News | भयानक! नवरा-नवरी पहिल्या रात्री छतावर झोपले, मोठ्या दीराने संपविले; पाच जणांची हत्या

भयानक! नवरा-नवरी पहिल्या रात्री छतावर झोपले, मोठ्या दीराने संपविले; पाच जणांची हत्या

उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यात पहाटे तीन वाजता लग्नसमारंभानंतर रक्तरंजित घटना घडली. लग्नघरात शुक्रवारी रात्री तीन वाजता एका तरुणाने त्याच्या कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या केली. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडून घेतली. मृतांमध्ये नवरदेव आणि नवरीचाही समावेश आहे.

शिववीर हा नोएडामध्ये कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र चालवत होता. शुक्रवारी त्याच्या लहान भावाची सोनूची वरात इटावाहून आली होती. रात्रीच्यावेळी सोनू आणि त्याची नवविवाहित पत्नी घराच्या छतावर झोपले होते. त्याचा छोटा भाऊ भुल्लन, भावाचा मित्र दीपक, भावोजी सौरभ हे अन्य नातेवाईकांसह खाली झोपले होते. 

रात्री जवळपास ११ वाजेवर्यंत नाचगाण्याचा कार्यक्रम रंगला होता. यानंतर हे सर्व झोपी गेले. सर्व गाढ झोपेत असताना शिववीरने छतावर जात सोनू आणि त्याच्या पत्नीची धारधार शस्त्राचा वार करून हत्या केली. यानंतर खाली येत त्याने झोपलेला लहान भाऊ, त्याचा मित्र आणि भावोजीचीही हत्या केली. यानंतर त्याने त्याची पत्नी डॉली आणि वडील सुभाषचंद्र यांच्यावरही हल्ला केला, परंतू ते जखमी झाले. 

त्यांचा आरडाओरडा ऐकून जागे झालेल्या नातेवाईकांनी शिववीरला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू, तो तिथून निसटला आणि घराच्या मागे गेला, तिथे त्याने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. एवढ्या मोठ्या हत्याकांडाचे कारण पोलिसांना समजलेले नाहीय. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: Terrible! The new wed couple slept on the roof for the first night, man killed Five people with them UP Crime News