"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:17 IST2025-11-25T13:15:40+5:302025-11-25T13:17:23+5:30
Ram Mandir Flag Hoisting: अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर भगवा धर्म ध्वज फडकावण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज (२५ नोव्हेंबर २०२५) अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर भगवा धर्म ध्वज फडकावण्यात आला. यानंतर नरेंद्र मोदींनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित केले. त्यांनी हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नसून भारतीय संस्कृती आणि रामराज्याच्या मूल्यांचे प्रतीक असल्याचे स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी म्हणाले की, "हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही तर, भारतीय संस्कृतीचा ध्वज आहे. भगवा रंग, सूर्यवंशाचे चिन्ह, 'ओम' शब्द आणि कोविदार वृक्ष हे सर्व रामराज्याच्या वैभवाचे प्रतिरूप आहेत. हा ध्वज एक संकल्प आहे, एक यश आहे, संघर्षाची कथा आहे. येणाऱ्या हजारो शतकांपर्यंत, हा ध्वज भगवान रामाच्या मूल्यांचा प्रचार करेल. हा ध्वज संतांची साधना आणि समाजाची प्रेरणा आहे. सत्य हेच धर्म आहे."
मोदी पुढे म्हणाले की, "हा ध्वज सांगेल की, प्राण जाये पर वचन न जाए, जे सांगितले जाईल तेच करावे, कर्म आणि कर्तव्याला प्राधान्य द्यावे, हेच या ध्वजाची मुख्य शिकवण असेल. हा धर्मध्वज वैर मिटवायला सांगेल आणि सर्वांचे सुख पाहायला सांगेल. हा ध्वज भेदभाव आणि पीडेतून मुक्ती देण्यास सांगेल. कोणी दुखी राहू नये, कोणी दरिद्री राहू नये, गरीबी राहू नये असा समाज बनवा."