सोन्याच्या एका नाण्यानं केलं कंगाल, 109 कॉइन्सच्या खरेदीत ज्वेलरला बसला लाखोंचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 10:19 IST2023-08-28T10:18:40+5:302023-08-28T10:19:31+5:30
येथील शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी संतोष कुमार वर्मा यांना, खजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उनवल येथील एका युवकाकडे 109 सोण्याचे नाणे आहेत आणि तो ते कमी किंमतीत विकत आहे, अशी माहिती मिळाली होती.

सोन्याच्या एका नाण्यानं केलं कंगाल, 109 कॉइन्सच्या खरेदीत ज्वेलरला बसला लाखोंचा फटका
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून फसवणुकीचा एक गुन्हा समोर आला आहे. येथे एका ज्वेलरला एका सोन्याच्या नाण्यासाठी तब्बल 12 लाख रुपये मोजावे लागले आहेत. येथील शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी संतोष कुमार वर्मा यांना, खजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उनवल येथील एका युवकाकडे 109 सोण्याचे नाणे आहेत आणि तो ते कमी किंमतीत विकत आहे, अशी माहिती मिळाली होती.
यानंतर, ज्वेलरने त्याच्याशी संपर्क साधून सोण्याचे एक नाणे घेतले. त्याने नाणे तपासून घेण्यासही सांगितले होते. आमच्याकडे असे 109 नाणे आहेत. याची किंमत बाजारात फार अधिक आहे. कारण ते मार्केटमध्ये विकले जाऊ शकत नाहीत. यामुळे आम्ही हे कमी किंमतीत देत आहोत. या बदल्यात आपल्याला केवळ 12 लाख रुपये द्यावे लागतील. यावर ज्वेलर राजी झाला.
असं आहे संपूर्ण प्रकरण -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ज्वेलरने नाण्याची तपासणी केली. यात पहिले नाणे बरोबर निघाले. यानंतर त्याने आणखी 108 नाणी घेतली. ही नाणी घेऊन ज्वेलर घरी गेला आणि त्याने ती नाणी तपासली. तेव्हा त्याच्या लक्षात आले, की ती नाणी खोटी आहेत. यानंतर फसवणूकझाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार केली.
ज्वेलरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमाने आणि सर्व्हिलान्सच्या मदतीने आरोपींना अटक केली आहे. एसएससी गौरव ग्रोव्हर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. इतर दोघांचा शोध सुरू आहे. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून 10 लाख 85 हजार रुपये आणि सोन्याची दोन नाणी जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून बनावट नोटांचे दोन बंडलही जप्त करण्यात आले आहेत. जे ते फसवणुकीसाठी वापरण्याच्या विचारात होते.