"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 12:18 IST2025-08-16T12:15:21+5:302025-08-16T12:18:00+5:30
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या निवास्थानी फडकवला तिरंगा, स्वातंत्र्यसैनिकांना अरपण केली श्रद्धांजली... जनतेला दिल्या स्वातंत्र्याच्या शुभेच्छा... ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशीसंदर्भातही भाष्य...

"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
लखनऊ - भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभ प्रसंगी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथील आपल्या सरकारी निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच, देशाला शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यातून मुक्त करणाऱ्या महान स्वातंत्र्यवीरांनाही विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्यमंत्री योगी म्हणाले, हे स्वातंत्र्य राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि असंख्य क्रांतिकारकांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षांचे फळ आहे. ज्यांनी देशाला,
उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एकजूट करून स्वातंत्र्यासाठी लढा दिला.
मुख्यमंत्री योगी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, "स्वातंत्र्याचा हा उत्सव केवळ उत्सव नाही, तर आपल्या राष्ट्रीय कर्तव्यांबद्दल जागरूकता आणि संकल्प करण्याचा दिवस आहे." मुख्यमंत्री योगी पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत 'विकसित भारता'च्या संकल्पाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भारतीय संविधानाने अमृत काळात प्रवेश केला आहे. सम आणि विषम परिस्थितीत संपूर्ण देशाला एकतेच्या धाग्यात बांधून, देशात सामाजिक न्याय, बंधुता आणि समानतेच्या संकल्पांना पुढे नेण्यात भारतीय संविधानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय जवानांच्या शौर्याचे प्रतीक - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री योगींनी नुकतेच 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय सैन्याच्या शौर्याचे आणि क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सारख्या स्वदेशी शस्त्रांच्या सामर्थ्याचे कौतुक केले. तसेच, ते भारताच्या आत्मनिर्भरतेचे आणि सामर्थ्याचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. योगी म्हणाले, उत्तर प्रदेशात, 'वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट'द्वारे स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याचे ब्रँडिंग करण्यासाठी, ते बाजारपेठेशी जोडण्यासाठी, नवीन डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानासह ते केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर देशासह जगाच्या बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी, चालवल्या जाणाऱ्या या कार्यक्रमामुळे पंतप्रधानांच्या 'व्होकल फॉर लोकल' मोहिमेला एक नवीन उंची मिळाली आहे.
योगी पुढे म्हणाले, स्वदेशी हा जीवनाचा भाग बनवणे, हा देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा संकल्प व्हायला हवा. यावेळी, देशाची अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी, नागरी पोलिस आणि इतर संघटनांच्या भूमिकेचेही मुख्यमंत्री योगी यांनी कौतुक केले. दरम्यान, "स्वातंत्र्य दिन हा हुतात्म्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी प्रेरणा घेण्याची एक संधी आहे. उत्तर प्रदेशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या कर्तव्यांप्रति संकल्पबद्ध होऊन, विकसित भारताचे स्वप्न साकार करावे लागेल," असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. Keywords
#स्वतंत्रता_दिवस_2025 #योगी_आदित्यनाथ #विकसित_भारत #आत्मनिर्भर_भारत #ऑपरेशन_सिंदूर, #IndependenceDay2025 #YogiAdityanath #DevelopedIndia #SelfReliantIndia #OperationSindoor