काठीने मारले, हातांनी बडवले, गुरुकुलमधील शिक्षकाचं क्रौर्य, विद्यार्थ्याला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 12:30 IST2023-10-09T12:29:27+5:302023-10-09T12:30:11+5:30

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये असलेल्या एका संस्कृत विद्यालयातील एका शिक्षकाच्या क्रौर्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. २.१२ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये शिक्षक एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे.

Beating with sticks, beating with hands, brutality of teacher in Gurukul, brutal beating of student | काठीने मारले, हातांनी बडवले, गुरुकुलमधील शिक्षकाचं क्रौर्य, विद्यार्थ्याला बेदम मारहाण

काठीने मारले, हातांनी बडवले, गुरुकुलमधील शिक्षकाचं क्रौर्य, विद्यार्थ्याला बेदम मारहाण

उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये असलेल्या एका संस्कृत विद्यालयातील एका शिक्षकाच्या क्रौर्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. २.१२ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये शिक्षक एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. एवढंच नाही तर मारहाण करत असतानाच शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला उचलून लादीवर आपटले. हा विद्यार्थी शिक्षकाकडे दयेची भीक मागत होता. मात्र या शिक्षकाला पाझर फुटला नाही. तो या विद्यार्थ्याला मारत राहिला.

या दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या कुणीतरी मारहाण करत असलेल्या शिक्षकाचा व्हिडीओ काढला. तसेच तो व्हायरल झाला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी त्याची दखल घेऊन तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सीतापूरच्या सीधौली एका गुरुकुलामध्ये घडली आहे. येथे शिवकणारे आचार्य सतीश यांनी किरकोळ गोष्टीवरून विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली.

आधी त्याने विद्यार्थ्याला गुरुकुलातून पळवून लावण्याची धमकी दिली. त्यावेळी अनेक विद्यार्थी तिथे उपस्थित होते. मात्र नंतर अचाकन सतीश याने विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आधी त्याने हाताने थपडा लगवाल्या. नंतर छडीने पिटाई करण्यास सुरुवात केली. एवढ्याने त्याचे मन भरले नाही. त्यामुळे त्याने या विद्यार्थ्याला उचलून लादीवर आपटले.

दरम्यान, हा व्हिडीओ सुमारे तीन महिने जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. सिधौलीचे ठाणाध्यक्ष राकेश कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणाची पडताळणी सुरू केली आहे. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल.  

Web Title: Beating with sticks, beating with hands, brutality of teacher in Gurukul, brutal beating of student