'भाऊजीनेच दिदीच्या शिक्षणावर पैसे खर्च केले', ज्योती मौर्यच्या भावाचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 16:17 IST2023-07-13T16:16:36+5:302023-07-13T16:17:24+5:30

SDM ज्योती मौर्य आणि आलोक प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे. यामुळे आलोकची बाजु मजबूत झाली आहे.

Alok-Jyoti Maurya case: 'brother-in-law spends money on sister's education', big revelation of Jyoti Maurya's brother | 'भाऊजीनेच दिदीच्या शिक्षणावर पैसे खर्च केले', ज्योती मौर्यच्या भावाचा मोठा खुलासा

'भाऊजीनेच दिदीच्या शिक्षणावर पैसे खर्च केले', ज्योती मौर्यच्या भावाचा मोठा खुलासा

Alok-Jyoti Maurya case: गेल्या काही दिवसांपासून SDM ज्योती मौर्या आणि आलोक यांच्या प्रकरणाची देशभर चर्चा सुरू आहे. या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता आलोकच्या मेव्हण्याने म्हणजेच ज्योती मौर्यच्या भावाने एक नवा खुलासा केला आहे, ज्यामुळे आलोकचे दावे खरे असल्याचे सिद्ध होत आहे. आलोकने दिदीच्या अभ्यासावर सर्व पैसे खर्च केले आहेत, असा खुलासा त्याने केला आहे. हा वाद चव्हाट्यावर आल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा खुलासा आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, ज्योती मौर्यच्या भावाने सांगितले की, जेव्हा दीदी एसडीएम बनण्याची तयारी करत होती, तेव्हा भाऊजी रोज तिला स्कूटीने कोचिंगसाठी सोडायचे. त्याने असेही सांगितले की, 2023 पर्यंत ज्योती आणि आलोक जलवामध्ये घेतलेल्या घरात राहायचे. अनेक वेळा आलोकचे आई-वडीलही तिथे राहायला यायचे. मात्र फेब्रुवारीनंतर फक्त ज्योती मौर्यचे कुटुंबीयच तिथे राहतात. 

ज्योती मौर्यचा भाऊदेखील कुटुंबीसोबत तिथेच राहून नागरी सेवेची तयारी करत आहे. दरम्यान, आलोक आणि ज्योतीमद्ये दुरावा कसा निर्माण झाला, हे फक्त त्या दोघांनाच माहित असल्याचे त्याने सांगितले. सध्या हे प्रकरण फॅमिली कोर्टात असून, ज्योतीने आलोकपासून फारकत घेण्यासाठी याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे, त्यांना दोन मुली आहेत, ज्यांच्यासाठी आलोक सर्व गोष्टी विसरुन आपल्या पत्नीसोबत राहण्यास तयार आहे.

नेमके प्रकरण काय ?
काही दिवसांपूर्वी बरेली येथील एसडीएम ज्योती मौर्य यांचे पती आलोकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये आलोकने पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले होते. आलोकने सांगितले होते की, त्याने लग्नानंतर पत्नीला शिकवलं आणि नागरी सेवेच्या परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले. पण, SDM झाल्यानंतर पत्नीने होमगार्ड कमांडंट मनीष दुबेसोबत अफेअर केले.

Web Title: Alok-Jyoti Maurya case: 'brother-in-law spends money on sister's education', big revelation of Jyoti Maurya's brother