Amol Mitkari : अहमदाबादचं नाव बदलून दाखवा, नामांतरावरुन मिटकरीचं भाजपला चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 06:35 PM2021-10-24T18:35:49+5:302021-10-24T18:37:40+5:30

उत्तर प्रदेशातील कित्येक शहरं अशी आहेत, ज्यांची नावे इस्लामी पद्धतीच्या राजवटीची आहेत, त्या शहरांची नावे तुम्ही बदलून दाखवा, असे आव्हानच मी चंद्रकांत पाटील यांना दिले होते.

Amol Mitkari : Change the name of Ahmedabad, Mitkari's challenge to BJP from renaming in osmanabad | Amol Mitkari : अहमदाबादचं नाव बदलून दाखवा, नामांतरावरुन मिटकरीचं भाजपला चॅलेंज

Amol Mitkari : अहमदाबादचं नाव बदलून दाखवा, नामांतरावरुन मिटकरीचं भाजपला चॅलेंज

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र सरकारने औरंगाबादच्या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं केलंय. लवकरच, शासन त्यावर निर्णय घेईल

उस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. भाजपाने शहरांच्या नामांतरावरुन राज्य सरकारला वेठीस धरू नये. शहरांची नाव बदलल्याने विकास होत नसतो, तर तेथील लोकांचा विकास महत्त्वाचा असतो, असे मिटकरी यांनी म्हटले. मिटकरी हे उस्मानाबाद दौऱ्यावर होते, त्यावेळी धाराशिव-उस्मानाबाद नामांतरासंदर्भात त्यांनी भाष्य केलं.

उत्तर प्रदेशातील कित्येक शहरं अशी आहेत, ज्यांची नावे इस्लामी पद्धतीच्या राजवटीची आहेत, त्या शहरांची नावे तुम्ही बदलून दाखवा, असे आव्हानच मी चंद्रकांत पाटील यांना दिले होते. शहरांची नावे बदलल्याने विकास होत नसतो, लोकांचा विकास महत्वाचा आहे. औरंगाबादच्या नामांतराचा विषय महत्वाचा आहे, पण नाव संभाजी महाराजांचं द्यायचं आणि तेथे पुन्हा विकास नसणं, कचऱ्याचे प्रश्न उद्भवणं हे औरंगाबादकरांना भेडसावत आहेत, असे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं. 

महाराष्ट्र सरकारने औरंगाबादच्या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं केलंय. लवकरच, शासन त्यावर निर्णय घेईल. आता, राहिला प्रश्न उस्मानाबाद जिल्ह्याचा, धाराशिव नावाची मागणी असली तर आजही भाजपा नेत्यांच्या लेटरपॅडवर उस्मानाबाद असंच लिहिलेलं आहे. त्यामुळे, जे या नाव बदलाची मागणी करतात, राज्य सरकारला वेठीस धरतात. मग, गुजरातमधील सर्वात मोठं शहर असलेल्या अहमदाबादचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलून दाखवावं, असे आव्हानच अमोल मिटकरी यांनी दिलं आहे.    
 

Web Title: Amol Mitkari : Change the name of Ahmedabad, Mitkari's challenge to BJP from renaming in osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app