शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या  माणसांनी लहान  मुलांकडून  खूप  गोष्टी  शिकल्या  पाहिजेत , असं  ती  का  म्हणते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 16:13 IST

अडोराचं टेड-टॉक! ती म्हणते, मोठय़ा माणसांनी आम्हा मुलांकडून खूपच गोष्टी शिकल्या पाहिजेत !

ठळक मुद्देव्हिडीओ बघता बघता, तुम्हाला हव्या त्या भाषेत तिचं भाषण तुम्ही वाचूही शकता.

 

किती वेळ पुस्तकं वाचणार? कितीवेळ स्वयंपाक घरात मदत करणार? हे सगळं करून झाल्यावरही चिक्कार वेळ उरतोच. शिवाय आई, कुणा मित्र-मैत्रिणींकडेही जाऊ देत नाही. साधं बिल्डिंगच्या खाली खेळायलाही पाठवत नाही. मग मुलं मोबाइलवर काहीतरी बघणारच ना? - तर बघणारच!! पण मग उगीच स्क्रोलिंग करत मोबाइलवर काहीतरी बंडल बघत बसण्यापेक्षा, किंवा उगीचच गेमिंग करण्यापेक्षा एखादी धमाल साइट बघितली तर? किंवा मस्तच व्हिडीओ बघितला तर? तुमच्याच वयाची खूप मुलं मस्त व्हिडीओज बनवत असतात, कुणी एखादी साइट चालवत असतं, किंवा खास मुलांसाठी म्हणून शॉर्ट फिल्म्स असतात.

   ऑनलाइन खूप बघण्यासारख्या गोष्टी असतात. आता अडोरा स्विटॉकच बघा ना. तुमच्यासारखीच चिमुरडी आहे. पण टेड टॉक या जगप्रसिद्ध व्यासपीठावर जाऊन तिचे जगातल्या तमाम मोठय़ांना चांगलंच सुनावलंय! ती म्हणते,  ‘आम्हा मुलांना बालिश म्हणणारे मोठे कोण? जगातली सगळी युद्ध, गरिबी मुलांनी नाही आणली. तर मुलांनी जगाला जवळ आणण्याचं काम केलं आहे. मुलांनी फक्त प्रेम वाटलं आहे. मुलांनी मोठय़ांनाही माणूस म्हणून जगायला शिकवलं आहे. आणि तरीही मोठे मुलांच्या वागण्याला बालिश म्हणतात!’ पुढे ती तिच्या भाषणात म्हणते, आम्ही मुलं मोठय़ांकडून अनेक गोष्टी शिकतो, पण आता वेळ आली आहे मोठय़ांनी आम्हा लहान मुलांकडून चार गोष्टी शिकण्याची! मोठय़ांनी कुठल्या गोष्टी लहान मुलांकडून शिकल्या पाहिजेत हे तुम्हालाही बघायचं असेल तर ऑनलाइन जा आणि सोबत दिलेली लिंक वापरा. म्हणजे मग तुम्हाला अडोराचा टेड टॉक बघता येईल.

   याचं इंग्लिश, मराठी आणि हिंदी ट्रान्स्क्रिप्टही त्या साइटवर आहे. व्हिडीओ बघता बघता, तुम्हाला हव्या त्या भाषेत तिचं भाषण तुम्ही वाचूही शकता.

हा व्हिडीओ कसा शोधायचा? :

गूगलवर जा.  Adora svitak tedtalk असे शब्दा सर्चला टाका, की गूगल देईलच शोधून अडोराचा व्हिडीओ!