शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही कधी कुणाला पत्र  लिहिलंय  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 16:39 IST

मला सुचली आहे एक भन्नाट आयडिया. तुम्हीही बघा करून !

ठळक मुद्देआपण पाठवू पत्र एकमेकांना. नेहमी. बघा, काय भ्भारी वाटतं ते!.

- अजिंक्य भोसले, सातारा

तुम्हाला काय वाटलं, आम्ही घरकोंबडे आहोत? काही काम नाही, धाम नाही, नुसत्याच चकाटय़ा आणि मोबाइल?पण नाही. आमचा दिवस तर बुवा एकदम मज्जेत जातो.तुम्हाला माहितीये, मी तर आता व्यायामही करायला लागलोय रोज. येऊच दे, त्या कोरोनाला. कशी फाइट करतो बघा त्याच्याशी. तो दिसत नाही, लपूनछपून, गनिमी काव्यानं येतो म्हणून, पण समोरासमोर लढला असता ना, तर त्याला असं मच्छरासारखं चिरडलं असतं. ते जाऊ द्या; पण मी सध्या काय करतोय, माहितीय्ये?.अरे, एक से एक आयडिया आहेत माङयाकडे. बसल्या बसल्या बोअरला फोर मारतो मी.काय म्हणता? - सांगू तुम्हालाही.

नुकताच मी एक खेळ खेळला. मित्रबरोबर. तुम्ही म्हणाल, काय ढॉ मारतोय ! अख्खं जग घरात बसलंय आणि तू कुठे एवढा मोठा बाश्शा लागून गेला मित्राबरोबर खेळायला !अरे, पण मी खरंच सांगतोय. आम्ही खेळलो. पण तो त्याच्या घरी होता आणि मी माङया घरी !.जाऊ द्या, सांगूनच टाकतो तुम्हाला. अरे, मी पत्र लिहिलं माङया मित्रला. ते वाचून तो एवढा खूश झालाआणि मग त्यानंही मला पत्र पाठवलं. एवढं भारी वाटलं ना, दोघांनाही.

तुम्ही पुन्हा म्हणाल, आता हा जरा जास्तीच ढॉ द्यायला लागला. घरात वर्तमानपत्र यायला मारामार आणि यांच्या घरात पत्रंही यायला लागली!.अरे, ऐका तर खरी. अगोदर मी हातानं पत्र लिहिलं माझ्या जिगरी दोस्ताला. मी या पत्राचा आईच्या मोबाइलवरून फोटो काढला.आईनं मग तिच्या व्हॉट्सअॅपवरून दिलं हे पत्र मित्राच्या आईला पाठवून ! त्यानंही मग मला तसंच पत्र पाठवलं. अशी आमची पत्रापत्री सुरू झाली. मी आणि माझा मित्र, दोघंही आता आमच्या इतर मित्रांना पत्र पाठवतोय, हातानं लिहून. तेही त्यांच्या मित्रांना पाठवताहेत. अर्धी ऑफलाइन आणि अर्धी ऑनलाइन अशी आमची पत्रापत्री सुरू आहे. फोनवर बोलण्यापेक्षा असं पत्र लिहिल्यावर आणि मित्राचं वाचल्यावर फार भारीवाटतं! माझ्या आई-बाबांनीपण मग त्यांच्या लहानपणी, तरुणपणी मित्र-मैत्रिणींनी त्यांना लिहिलेली पत्र दाखवली. ती वाचताना त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं; पण ती पत्रं त्यांनी अजून जपून ठेवली आहेत, याचं मला फार आश्चर्य वाटलं. आपल्याला तर अशी पत्रं जपून ठेवायची काही गरज नाही, कारण आपण ती पत्रं सेव्ह करू शकतो. मोठे झालो, आठवण आली की वाचत जाऊ आपण ती पत्रं.

पण मला एक शंका आहे, ती पत्रं वाचताना आपणही मोठेपणी असं रडू का?. आई-बाबा म्हणतात, अरे, हे रडणं आनंदाचं आहे !

कसं ते काही मला कळलं नाही; पण आपण पाठवू पत्र एकमेकांना. नेहमी. बघा, काय भ्भारी वाटतं ते!.