शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पत्थर के फुल ! दगड पेंट करायची ही भन्नाट ट्रिक वाचा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 07:45 IST

तुम्हाला थोडे दगड मिळतील का? ते आणा शोधून, आज आपण त्यांची मज्ज करूया!!

ठळक मुद्देदगड रंगवून निदान घराचा एक कोपरा तरी तुम्ही छान डेकोरेट करू शकता.

तुमच्या घराच्या खाली किंवा बाहेर अंगणात दगड आहेत का? लगेच त्याच्यावर पीजे मारायचे नाहीत. की आम्हालाच घरातले सगळे दगड म्हणतात, अजून कशाला बाहेरचे दगड वगैरे बोअर करायचं नाही अजिबात!एकदम सिरियसली सांगा की बाहेर कुठे दगड आहेत का? म्हणजे साधारण दोन इंच व्यासाचे. थोडे लहान- मोठे चालतील. त्यात जर का गुळगुळीत गोटे सापडले तर फारच भारी. पण समजा गुळगुळीत गोटे नसतील आणि ओबडधोबड दगड असतील तरी चालतील.असे पुरेसे दगड गोळा करा. पुरेसे म्हणजे साधारण दोन पासून दहापयर्ंत कितीही. आता तुमचे वॉटर कलर्स शोधा. ब्रश, रंग मिक्स करायची डिश असं सगळं शोधा. ते सगळं सापडलं, की ते आणलेले दगड स्वच्छ धुवून घ्या. मग पुसून घ्या.आता आपल्याला ते दगड रंगवायचे आहेत. हसू नका! खरंच रंगवायचे आहेत. तुम्हाला जेवढी चित्रकला येत असेल त्यानुसार तुम्ही त्यावर काय चित्र काढायचं ते ठरवू शकता. बाकी काही सुचत नसेल तर निदान छोटंसं पान- फूल, होडी, सूर्य, चंद्र आणि चांदण्या अशी सोपी चित्र तर तुम्ही त्यावर नक्की रंगवू शकता.

हे रंगवलेले दगड अतिशय छान दिसतात. आणि ते तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वापरून शकता. म्हणजे सगळ्यात आधी तर पेपर वेट म्हणून ते वापरू शकता. किंवा बाथरूममध्ये किंवा हॉल मध्ये एखाद्या कोप?्यात या दगडांचं डेकोरेशन करू शकता. त्यासाठी आधीच ठरवून एकाच थीमने दगड रंगवू शकता. म्हणजे वेगवेगळी फुलं किंवा बॅकग्राउंड काळी करून वर चंद्र चांदण्या किंवा बॅकग्राउंड पाण्यासारखी निळी करून त्यावर मासे, ऑक्टोपस, कासव असं काढू शकता.पण दगड रंगवून निदान घराचा एक कोपरा तरी तुम्ही छान डेकोरेट करू शकता.