शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अरे , कोण आवरणार तुझं कपाट ? फुटेल  ते :)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 15:57 IST

इमानदारीत केलं, तर या कामात बोअर होण्यासारखं काही म्हणजे काहीसुद्धा नसतं!

ठळक मुद्देसगळ्यात रटाळ काम कुठलं असं विचारलं तर निदान 90 टक्के मुलं सांगतील की आपलं कपाट आवरणे !

- गौरी पटवर्धन

काही कामांना ना काही ऑप्शनच नसतो. म्हणजे ती आपल्याला कितीही बोअर झाली, आपल्या दृष्टीने ती फालतू असली, आपल्याला असं वाटलं की यात नुसता वेळ जातोय तरी त्याने काहीही उपयोग होत नाही. काही कामं आईबाबांना फार फार महत्त्वाची वाटतात आणि त्यामुळे ती आपल्याला करावीच लागतात. खरं तर अशा कामांची यादी बरीच मोठी आहे; पण तरी त्यातलं सगळ्यात रटाळ काम कुठलं असं विचारलं तर निदान 90 टक्के मुलं सांगतील की आपलं कपाट आवरणे !

आपल्या कपाटात आपल्याला जे पाहिजे ते सगळं सापडत असताना आईवडिलांना ते कशासाठी आवरून पाहिजे असतं ते त्यांचं त्यांनाच माहीत ! पण म्हटलं ना, की काही कामं करावीच लागतात. मग जर का हे बोअर काम करायलाच लागणार असेल तर निदान असा विचार करूया की त्यात आपल्या फायद्याचं काही असू शकतं का?

जर का तुम्ही एकदा इमानदारीत कपाट आवरलं तर तुमच्या लक्षात येईल की हे काम वाटतं तितकं घाटय़ात जात नाही. त्यातून आपल्याही फायद्याच्या काही वस्तू सापडू शकतात. सगळ्यात आधी तर आपले हरवलेले कपडे सापडतात. कशावर तरी मॅचिंग सापडतं. एखादं पुन्हा फॅशनमध्ये आलेलं जॅकेट सापडतं, मित्रमैत्रिणींशी एक्स्चेंज करता येतील अशी कार्ड्स, स्टिकर्स सापडतात. वेगळी कानातली, गळ्यातली सापडतात. आणि सगळ्यात महत्त्वाच जुन्या वह्या सापडतात. त्यातल्या मागच्या पानांवर मित्रमैत्रिणींशी लिहून मारलेल्या गप्पा सापडतात. त्यामुळे कपाट लावा, अशा वह्या शोधा आणि त्याची शेवटची पानं नीट उचलून जपून ठेवा.पुन्हा बाहेर पडाल तेव्हा त्या मित्रला / मैत्रिणीला दाखवता येतील.