शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : लॉक डाउन म्हणजे नेमकं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 17:33 IST

लॉकडाउनच्या काळातही बाहेर पडायला बंदी असते. शिवाय आता घरात बसणं ही तुम्हा मुलांसकट सगळ्यांची जबाबदारी आहे. तरच कोरोनाला आपण हरवू शकतो.

ठळक मुद्देलॉकडाउन आहे तर घाबरून जाऊ नका.

ज्यावेळी एखादी आपत्ती येते जशी आता कोरोना विषाणूमुळे आली आहे तेव्हा लोकांचे जीव वाचवण्यासाठी शहर बंद केलं जातं. आवश्यकता असल्यास देशही बंद केला जातो. त्याला लॉकडाउन म्हटलं जातं. आपल्याकडे सध्या लॉकडाउन जाहीर झाला आहे कारण कोरोनाचा प्रचंड धोका आहे. लोक रस्त्यावर आले, बाहेर पडले तर हा धोका वाढू शकतो म्हणून शहरं बंद केलेली आहेत. दुकानं, थिएटर्स, नाटय़गृह, जिम, स्विमिंग पूल, बागा
सगळं बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवा जसे की औषधाची दुकानं, किराणा, भाजीपाला, दूध या गोष्टी मिळणारी ठिकाणं उघडी ठेवायला परवानगी आहे. लॉकडाउन फक्त आपल्याकडे केलं आहे का? तर नाही, जगातले अनेक देश आता लॉकडाउन आहेत कारण कोरोना हा आजार जगभर पसरलेला आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू घेण्यापुरतं बाहेर जायला परवानगी असते. त्यापलीकडे काहीही काम करायला कुणीही कुठेही बाहेर जाऊ शकत नाही. म्हणूनच तर आईबाबा वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यांची ऑफिसेस बंद आहे. त्यामुळे त्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आपण फक्त लॉकडाउन केलेलं नाही तर परदेशातून येणा:या विमानसेवाही बंद केल्या आहेत. कारण कोरोना विषाणू परदेशातून आपल्याकडे
आलेला आहे. तो इथे जन्माला आलेला नाही. त्यामुळे परदेशातून अजून कोरोनाबाधित लोक यायला नकोत यासाठी आपण परदेशी विमानसेवा बंद करून टाकली आहे.

लॉक -डाउनच्या काळातही बाहेर पडायला बंदी असते. शिवाय आता घरात बसणं ही तुम्हा मुलांसकट सगळ्यांची जबाबदारी आहे. तरच कोरोनाला आपण हरवू शकतो. लॉकडाउन आहे तर घाबरून जाऊ नका. गरजेचं सगळं उपलब्ध आहे. फक्त आपल्या सेफ्टीसाठी आपण सध्या घरातच थांबायचं आहे. घरातच मजा करायची आहे. शिवाय आपल्या सोबतीला टीव्ही आणि पुस्तकं असतंच, काय?

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या