शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनावर औषध नाही? ते कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 22:12 IST

यूएस नॅशनल इन्स्टिट्यूटचे संशोधक डॉ. थोनी फाउसी यांच्या म्हणण्यानुसार मानवी चाचण्या आवश्यक काळात पूर्ण झाल्या तर ही लस 12 ते 18 महिने म्हणजेच आजपासून वर्ष दीड वर्षात उपलब्ध होईल.

ठळक मुद्देहात धुवायचे, स्वच्छता पाळायची आणि सध्यातरी घरातच बसायचं. 

कोरोनाची लस कधी निघेल?कोरोनावर लस शोधण्याचे प्रय} जगभर सुरु आहेत.  या महामारीवरच्या लसीचे पहिले मानवी टेस्टिंग अमेरिकेत सुरु झाले आहे. या लसीच्या सुरुवातीच्या चाचण्या माकडांवर यशस्वी झाल्यावर मानवावर चाचण्या सुरु झाल्या आहेत. आणि 43 वर्षांची जेनिफर हॉलर,  मायक्रोसॉफ्ट या कंपनीत काम करणारे नील ब्राउनी यांचा पहिल्या चाचणीत समावेश होता. अजून 500 लोकांवर या चाचण्या होणार आहेत आणि  यात लोकं स्वत:हून पुढाकार घेऊन सहभागी होत आहेत. या सगळ्यांना ChAdOx1 nCoV-19 vaccine  ही लस टोचण्यात येणार आहे. आफ्रिकेत 2014 मध्ये इबोला आऊटब्रेक झाला होता तेव्हाही अशीच झटपट त्याची लस विकसित करण्यात शास्त्रज्ञाना यश आलं होतं त्यामुळे आपल्याला लवकरच कोरोनावर लस मिळेल. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूटचे संशोधक डॉ. थोनी फाउसी यांच्या म्हणण्यानुसार मानवी चाचण्या आवश्यक काळात पूर्ण झाल्या तर ही लस 12 ते 18 महिने म्हणजेच आजपासून वर्ष दीड वर्षात उपलब्ध होईल. 

कोरोना लस कशी बनवली जातेय?

सर्वसाधारणपणो लस दिली जाते ती रोग होऊ नये यासाठी. लस रोग बरा करण्यासाठी नाही तर होऊच नये यासाठी दिली जाते. लस बनवताना ज्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्ध मेलेले जंतू वापरून बनवली जाते. अशी लस शरीरात पोचली की त्या रोगाशी लढण्याची शरीराची तयारी होती. आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पण कोरोनाची लस बनवण्यासाठी प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूचा जेनेटिक कोड कॉपी करून त्यापासून लस बनवली जातेय. त्यामुळे ती प्रभावशाली बनेल आणि लवकरच आपल्याला उपलब्ध होईल. तोवर हात धुवायचे, स्वच्छता पाळायची आणि सध्यातरी घरातच बसायचं. 

या लसीचे काही साईट इफेक्टस आहेत का?

प्रत्येक औषधाचे काही ना काही परिणाम होतात. ते नेमके काय असतात हे मानवावर चाचण्या झाल्याशिवाय समजू शकत नाही. म्हणूनच कोरोनाच्या मानवी चाचण्या महत्वाच्या आहेत.