हिवाळ्यात जंगल सफारीसाठी बेस्ट पर्याय; प्राण्यासोबतच निसर्गसौंदर्यही अनुभवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 12:00 IST2019-10-18T11:59:55+5:302019-10-18T12:00:25+5:30
हळूहळू वातावरणातील गारवा वाढत अलून अनेकजण फिरण्यासाठी बाहेर जाण्याचा प्लान करत आहेत. हिवाळ्यात अनेक लोक नवनवीन ठिकाणी फिरण्यासाठी जातात. यामध्ये अनेकांची पसंती हिल स्टेशन्सला असते. पण यावेळी थोडासा वेगळा पर्याय तुम्ही निवडू शकता.

हिवाळ्यात जंगल सफारीसाठी बेस्ट पर्याय; प्राण्यासोबतच निसर्गसौंदर्यही अनुभवा
हळूहळू वातावरणातील गारवा वाढत अलून अनेकजण फिरण्यासाठी बाहेर जाण्याचा प्लान करत आहेत. हिवाळ्यात अनेक लोक नवनवीन ठिकाणी फिरण्यासाठी जातात. यामध्ये अनेकांची पसंती हिल स्टेशन्सला असते. पण यावेळी थोडासा वेगळा पर्याय तुम्ही निवडू शकता. तुम्ही या हिवाळ्यात जंगल सफरी करू शकता. प्राण्यांना जवळून पाण्यासोबतच तुमची ही ट्रिप अॅडव्हेंचर्स होऊ शकते. लहानपणी टिव्हीवर दिसणारे प्राणी जवळून पाहणं म्हणजे अत्यंत सुखद अनुभव असतो. आज आम्ही तुम्हाला काही अशाच सुंदर जंगलांची लिस्ट सांगणार आहोत. जिथे जाऊन तुम्ही अॅडव्हेंचरसोबत थ्रिलही अनुभवू शकता.
कार्बेट नॅशनल पार्क
जिम कार्बेट नॅशनल पार्क उत्तराखंडमध्ये स्थित आहे. हे ठिकाण जगभरामध्ये पांढरे हत्ती आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात येथे तुम्हाला थंडीचं धुकं आणि हिरवगार झालेल्या जंगलाचं सुंदर दृश्य पाहता येईल.
बांधवगढ नॅशनल पार्क
मध्येप्रदेशमध्ये असणारं बांधवगढ नॅशनल पार्क कार सफारीचा आनंद घेण्यासाठी आणि एलिफंट सफारीसाठी उत्तम ठिकाण आहे. जर तुम्हाला वन्य प्राणी पाहायला आवडत असतील तर हे ठिकाण फिरण्यासाठी उत्तम ठरेल. येथे जंगलामधील वाघ, हत्ती यांसारखे वन्य प्राणी पाहण्याचा अनुभव घेता येइल. येथे फिरण्यासाठी हिवाळा अत्यंत उत्तम ठरतो. कारण या दिवसांमध्ये जंगलामध्ये प्राणी तुम्हाला फिरताना दिसतील.
कान्हा नॅशनल पार्क
कान्हा नॅशनल पार्क हत्तींसोबतच वाघांसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच येथे अनेक दुर्मळ प्रजातीचे प्राणी पाहायला मिळतात. तसेच कान्हा नॅशनल पार्क हा देशातील सर्वात महत्त्वपूर्ण व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे.
रूडयार्ड किपलिंगच्या लोकप्रिय जंगल बुकमधून प्रेरणा घेऊन कान्हा व्याघ्र प्रकल्स तयार केलाय. इथे तुम्ही सफारीवर असाल तर सहजपणे फिरता फिरता वाघ बघू शकता. असे सांगितले जाते की, १८७९ ते १९१० दरम्यान हे ठिकाण इंग्रजांसाठी शिकारीचं महत्त्वाचं स्थान होतं. कान्हाला अभायरण्य म्हणून १९३३ मध्ये मान्यता देण्यात आली. तर १९५५ मध्ये या ठिकाणाला नॅशनल पार्कचा दर्जा देण्यात आला.
(Image Credit : www.guwahatiairport.com)
कांजीरंगा नॅशनल पार्क
कांजीरंगा नॅशनल पार्क आसाममध्ये असून येथे तुम्हाला हत्तीच्या पाठीवर बसून जंगलाची सैर करवण्यात येते. येथे तुम्हाला वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात.