शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 8:13 PM

‘महाराष्ट्रातील काश्मीर’ असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेले महाराष्ट्रातील हे एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे.

- विनायक पात्रुडकर महाराष्ट्रातील काश्मीर’ असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेले महाराष्ट्रातील हे एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. विशेष म्हणजे ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला लाभलेले उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम असून ‘महाराष्ट्राचे नंदनवन’ म्हणून ते ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर हे निसर्गरम्य ठिकाण आहे.महाबळेश्वर या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘महान सामर्थ्यवान ईश्वर’ असून खरोचरच हे ठिकाण दिव्य असून त्याला दैवी देणगी लाभली आहे. पर्यटकांना येथे मोहकता, नैसर्गिक सौंदर्य आणि आधुनिकता याचा अनोखा संगम पहायला मिळाते. मळकोम पेठ, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि शिंडोल अशा तीन खेडेगावांनी महाबळेश्वर शहर निर्माण झाले आहे. मुंबईपासून साधारणत: २८५ कि.मी अंतरावर असलेले हे निसर्गरम्य ठिकाणी पठार आणि खोल द-यांनी वेढले आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाळ्यात तर हा परिसर जलमय होतो.

पण त्याचबरोबर त्याचे सौंदर्य आणखनिच खुलून येते. मुंबईपासून जवळची थंड हवेची ठिकाण म्हणजे लोणावळा -खंडाळा तसेच माथेरानप्रमाणे या ठिकाणावरील पॉईट पर्यटकांना नेहमीच आकर्षक करतात. ऐतिहासीक वारस्याबरोबरच येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गावित्री या पाच न उगम पावत असल्याने क्षेत्र महाबळेश्वर म्हणूनही हे ठिकाण प्रसिद्ध आहे.पर्यटकांच्या आकर्षणाची खास ठिकाणे म्हणजे पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर, मंकी पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, वेण्णा लेक, केइंटटस पॉ, एलीफंट पॉइंट, विल्सन पॉइंट, प्रतापगड, लीग्नमाला धबधबा. तसेच येथील अनेक स्मारके थेट ब्रिटीशकाळात घेऊन जातात.  महाबळेश्वरपासून सुमारे १९ कि.मी अंतरावर असलेले पाचगणी हे पाच टेकड्यांच्या कुशीतील ठिकाण पर्यटकांना आपल्याकडे अक्षरश: खेचते.
निसर्गाच्या कुशीत हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊसच्या माध्यमातून राहण्याचीही उत्तम सोय असल्याने कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. तसेच घनदाट जंगलामध्ये वसलेले महिंद्रा शेरवूड रिसॉर्टही नैसर्गिक सौंदर्याची अनुभती देणारे आहे.महाबळेश्वरमधील हवामान स्ट्रॉबेरीसाठी योग्य असल्याने, या भागात मोठ्याप्रमाणात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर रासबेरी, जांभळाचा मध ही प्रसिद्ध आहे. पर्यटकांना कोणत्याही हंगामात आपल्याकडे आकर्षीत करणारे हे एक उत्तम ठिकाणी आहे. येथे जाण्यासाठी बस, रेल्वे वा विमान सेवेचाही उपयोग करता येईल.

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानTravel Tipsट्रॅव्हल टिप्सMaharashtraमहाराष्ट्रtourismपर्यटन