शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओच्या कामकाजात आली सुसूत्रता

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

आरटीओच्या कामकाजात आली सुसूत्रता

आरटीओच्या कामकाजात आली सुसूत्रता
-गर्दी कमी झाली : दलालांच्या हद्दपारीने कामाचा वेगही वाढला
(आरटीओच्या इमारतीचा फोटो घ्यावा)

नागपूर : परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या आदेशानंतर दलालांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) बाहेर ठेवण्याच्या प्रयत्नाला तूर्तास तरी यश मिळाले आहे. परंतु तोकड्या मनुष्यबळामुळे या यशावर संशय व्यक्त केला जात आहे. कार्यालयातून दलाल हद्दपार झाल्याने कामकाजात सुसूत्रता आली आहे. गर्दी कमी झाल्याने कामाचा वेगही वाढल्याचे चित्र आहे.
परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार दलालांना सोमवारपासून कार्यालयाच्या बाहेर ठेवण्यात येत आहे. यासाठी आरटीओने पोलिसांची मदत घेतली आहे. सोबतच मोटार वाहन सहायक निरीक्षकांवरही याची जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी आरटीओ गेटवर प्रत्येकाला त्याच्या कामाची चौकशी करून पुढे सोडले जात आहे. दलालांचा हस्तक्षेप नसल्याने आरटीओत गुरुवारी देखील सुटसुटीतपणा आला होता. दिवसभर आरटीओ परिसरात शांतता दिसत होती. कधी नव्हे ते इतक्या शिस्तीत बुधवारी रांगा लागलेल्या होत्या. दलाल नसल्याने स्वत: अर्जदाराला उपस्थित रहावे लागत आहे. नव्या नियमांमुळे वाहनचालक, मालक स्वत:च आपली कामे करण्यासाठी पुढे येत आहेत. यात फक्त ट्रेड सर्टिफिकेट असलेल्यांनाच सूट देण्यात आली आहे. ड्रायव्हिंग स्कूल, वाहन विक्र ेते आणि वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांना ही सवलत आहे. त्यांच्याकडून कागदपत्रे स्वीकारली जात आहेत.
-आरटीओच्या उत्पन्नात फरक नाही
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले, दलालांना बाहेर काढण्यात आले असलेतरी आरटीओला मिळणाऱ्या महसुलामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही. वाहन नोंदणीची संख्याही घसरलेली नाही.