महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
‘कदम से कदम आज तू, मिला रही है हर मर्द से, आँख मिलाती है तू, हर दर्द से, तुम्ही से आज तुम्ही से कल है, हर मुश्किल का तेरे पासही हल है’ या कवितेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या अंजली गद्रे यांनी वीरपत्नींचे मनोबल उंचावले. ...
स्त्री ही आदिशक्ती आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना त्यांच्या जगनिर्मितीच्या कार्यासाठी प्रेरणा देणारी शक्ती ही स्त्री शक्तीच आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे केले. ...
जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने उपराजधानीत विविध संघटना, संस्था, शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करून महिलेच्या अस्तित्वाचा सन्मान करण्यात आला. ...
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस विभागाच्या वतीने शुक्रवारी गडचिरोली शहरातील मुख्य मार्गावर तब्बल चार किलोमीटरची मानवी साखळी तयार करण्यात आली. यात जिल्ह्याच्या विविध भागातील १२ हजार विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. ...
पंचायत समिती, नगर परिषद, तहसील, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला़ ...
जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारी दिवसभर जिल्हाभरात महिलांच्या सन्मानार्थ रॅली काढण्यात आली. तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा यानिमित्ताने गौरव करुन स्त्री शक्तीला अभिवादन करण्यात आले. ...