Women's Day Special : आघातावर मात करून पानगावच्या शिक्षिकेने जपले सावित्रीचे लेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:35 AM2019-03-09T11:35:13+5:302019-03-09T11:35:47+5:30

प्रसाद पाटील  पानगाव : नारी ही दोन्ही घरांची उद्धारक असते, पण कौटुंबिक आघातानं स्वत:चं आयुष्य काळवंडलं असताना सासरपण आणि ...

Women's Day Special: Pataavana teacher Savitri has been confined to overcoming the onslaught | Women's Day Special : आघातावर मात करून पानगावच्या शिक्षिकेने जपले सावित्रीचे लेणे

Women's Day Special : आघातावर मात करून पानगावच्या शिक्षिकेने जपले सावित्रीचे लेणे

Next

प्रसाद पाटील 

पानगाव : नारी ही दोन्ही घरांची उद्धारक असते, पण कौटुंबिक आघातानं स्वत:चं आयुष्य काळवंडलं असताना सासरपण आणि माहेरपण जपत सरस्वती बनून गावातील विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्याचा वसा घेतलाय एका शिक्षिकेने. ‘अध्यापन हेच जीवन’ समजून ३६५ दिवस काम करणाºया महादेवी स्वामी या शिक्षिकेसमोर विद्यार्थीच नव्हे तर पालकही नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत. 

स्पर्धेच्या या युगात मेहनती विद्यार्थीच टिकतील हे स्वत:च्या संघर्षावरून ताडत... महादेवी स्वामी या २००५ मध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून पानगाव झेडपी शाळा क्र. २ मध्ये रुजू झाल्या. नोकरी लागल्याचा आनंद ओसरतो न् ओसरतो तोच कौटुंबिक आघातानं एकलेपण आलं, पण जराही विचलित न होता कौटुंबिक आधार घेत शिक्षण क्षेत्राला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण गुणवत्ता खासगी शाळांपेक्षा सरस करण्याचा वसा घेतला. काम सुरू झालं... ना वेळेचं बंधन... ना विषयाचं बंधन.... गुणवत्तेबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, क्रीडा, स्पर्धा परीक्षा यांमध्ये विद्यार्थ्यांची चमक दिसू लागली.

महादेवी स्वामी यांनी गेल्या चौदा वर्षांच्या इमानेइतबारे केलेल्या सेवेचे फलित म्हणजे त्यांचे विद्यार्थी आज वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, अभिनय, स्पर्धा परीक्षा अशा विविध क्षेत्रात आपले करिअर करत आहेत. पहिली ते करिअर करणाºया विद्यार्थ्यांना त्या सर्वतोपरी मार्गदर्शन, सहकार्य करण्यास सदैव तत्पर असतात. शाळेचा गुणवत्तेचा ‘अ’ दर्जा राखत त्यांनी गावाचं नाव निश्चितच तालुक्याच्या व जिल्ह्याच्या नकाशावर ठळक केलं आहे.

Web Title: Women's Day Special: Pataavana teacher Savitri has been confined to overcoming the onslaught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.