प्रधान मुख्य संरक्षकांच्या कार्यालयात मंगळवारी वेगळाच अनुभव आला. चक्क मसन्या उद हा प्राणी त्यांच्या कार्यालयातील तिसऱ्या माळ्यावर शिरला. अखेर त्याला पकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे काही काळ वनभवनमध्ये एकच खळबळ उडाली. ...
गोंदिया जिल्ह्यातील जंगलालगत असलेल्या गावांमध्ये वनप्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. अशात जंगलातून पाण्याच्या शोधात भटकत आलेली दोन अस्वले विहिरीत पडल्याची घटना तालुक्यातील जांभळी येथे सोमवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास घडली. ...
आरमोरी ते देसाईगंज जवळील कुरूडपर्यंतच्या जवळपास १० किलोमीटरच्या जंगलात गेल्या दिड महिन्यात वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी तर एकाला गंभीर जखमी व्हावे लागले. तीन वर्षांपूर्वी याच भागात वाघाने दोन जणांवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला तर काहींना जखमी के ...
काळविटाची शिकार करुन मांसविक्री करणाऱ्या एकास यवतमाळ जिल्ह्यात अटक करण्यात आली. त्याच्याजवळून मांस, तराजू, गंज, दुचाकी आदी मुद्देमाल जप्त करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ११ वाजता रेणुकापूर वनक्षेत्रात करण्यात आली. ...
नरेंद्र डोंगर परिसरात पुन्हा एकदा महाकाय गव्यांच्या कळपाने आपली हजेरी लावली आहे. त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेल्यांना आठ गवे समोर दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. पूर्वी एखादा गवा दिसत होता. मात्र, आता गवे हे कळपाने खाली यायला लागल्याने सकाळी व सायंकाळच् ...
शुक्रवारी पिंपळगाव खांब भागातील जाधव वस्तीलगतच्या मळे भागात हा बिबट्या मुक्तपणे संचार करताना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. ही बाब येथील शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. ...