गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा कोरोनाच्या समस्येला तोंड देत आहे. बाधितांची संख्या वाढल्याने जिल्ह्याचा थेट रेड झोनमध्ये समावेश झाला. कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना आता जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मागील वर्षी विलंब व उशिरा आलेल्या प ...
गुडवणवाडीमध्ये आदिवासी लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी डोंगर उतरून खाली यावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायतीने गेल्यावर्षी खोदलेल्या बोअरवेलला चांगले पाणी असल्याने सध्या पूर्वीसारखी पाणीटंचाई तेथे नाही. ...
तलाव, विहीरी, बोअरवेल यांनी आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने नागरिकांना भर उन्हात पायपीट करावी लागत आहे. ...
वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे या भागातील वीज पुरवठा कधीही खंडीत होतो. पण आता ट्रान्सफार्मरच जळाल्यामुळे वीज पुरवठा पाच दिवसांपासून पूर्णपणे खंडीत आहे. गर्रेपल्ली व आसमटोला येथे आठवड्यातून दोन दिवस नेहमीच वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्येला तोंड द् ...
पोलादपूर तालुक्यात १ एप्रिल ते ३० जून २०२० या कालावधीत पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये ४६ गावे आणि १२३ वाड्यांचा समावेश टंचाई निवारण आराखड्यात करण्यात आला होता. यापैकी सद्य:स्थितीत २३ गावे, ४७ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ...
तुमसर मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे अशी ओळख निर्माण झालेल्या राजीव गांधी (बावनथडी) प्रकल्प हा बावनथडी नदीवर उभारण्यात आला त्यामुळे मध्यप्रदेशातून नदीवाटे येणारा पाणी राजीव गांधी प्रकल्पातच अडविले जात आहे. परिणामी बावनथडी नदीत पाण्याचा ठ ...
शहरातील संजयनगर झोपडपट्टी भागात किमान दोनशे घरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. आर्वी येथे ब्रिटिशकालीन सारंगपुरी जलाशय आहे. १९१६ पासून याच जलाशयातील पाणी २००६ पर्यंत आर्व ...
जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात सोशल डिस्टन्सिंग ठेवून आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याकडून ग्रामीण भागातील पाणीटंचाई व जलसंधारणाच्या ...