नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
रोजगार सेवक किशोर शेंडे हा त्यांच्या घरी गेला. त्याने तक्रारदारास घरकुल व बँक खात्या संबंधीत कागदपत्र आणून देण्यास सांगत मजुरांच्या मजुरीचे पैसे काढून देण्यासाठी ५०० रूपयांची मागणी केली. यावर तक्रारदारांनी २९ जानेवारी २०२० रोजी लाच लुचपत प्रतिबंधक वि ...
नगरपरिषदेच्या कराचा भरणा केलेली पावती जोडल्याशिवाय नवीन नळ जोडणीचा अर्ज मंजूर होत नाही. हाच मुद्दा घेऊन भाजप गटनेत्यासह इतर नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांपुढे करात सवलतीचा प्रस्ताव ठेवला. यवतमाळ शहरातील जनतेकडे मालमत्ता कर थकीत असल्यामुळे महाराष्ट्र जीव ...
आरमोरी-रामाळा मार्गालगत नदीच्या पुलाजवळ स्मशानभूमीची एकमेव जागा आहे. येथे अनेक जातीधर्माचे लोक मृतांवर अंत्यसंस्कार पार पाडतात. सध्या या ठिकाणी कचºयाचे ढीग असून झाडेझुडपे वाढल्याने जंगलाचे रूप प्राप्त झाले आहे. अंत्यविधीत सहभागी होणाºया नागरिकांना पा ...
सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वसाहतीच्या इमारतीच्या बांधकामाला २०१३ मध्ये सुरुवात झाली. सात वर्षे पूर्ण होत असतानाही या इमारतीचे बांधकाम अर्धवट आहे. अशातच दोन दिवस आलेल्या पावसाच्या सरी पाहता या इमारतीच्या खिडक्यांवर टाकलेला सज्जा कोसळल्या ...
यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चार महिन्यांपासून मातीच्या मूर्ती तयार केल्यात. २२ ऑगस्टरोजी तीन दिवस अगोदर मूर्ती विक्री साठी उपलब्ध असतात. कोरोनाचा धोका लक्षात घेता संघटनेमार्फत संक्रमणापासून बचावासाठी बाजारपेठेत सूचना फलक लावण्यात येणार असून स ...
पवनी पंचायत समिती अंतर्गत कोसरापेठ येथील रहिवासी असणाऱ्या शिवा कामथे यांचे विटामातीचे घर गत पाच वर्षापुर्वी पडले आहे. त्यानंतर प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आजही कामथे यांना आपल्या कुटुंबासह जीव मुठीत घेव ...
कुरखेडा तालुक्यात ग्रुप ऑफ ग्रामसभा तयार करण्यात आले आहे. फेब्रुवारी ते जून या कालावधीत मोहफूल, तेंदू यासह अन्य वनोपज गोळा करण्याचे काम नागरिकांकडून केले जाते. या माध्यमातून त्यांची उपजीविका चालते. यावर्षी लॉकडाऊनमुळे नागरिकांचा रोजगार बुडाला. ...