छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
शिवज्योत प्रज्वलित करुन लालमहाल ते एसएसपीएमएस संस्थेच्या प्रागंणातील शिवरायांच्या अश्वारुढ स्मारकापर्यंत वाटचाल करित शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे ...
Shivjayanti Kolhapur : सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संसर्गामुळे पारंपारिक पद्धतीने येणाऱ्या शिवजयंती उत्सवावर निर्बंध आले. त्यामुळे शहरातील बहुतांशी मंडळांनी गुरुवारी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साधेपणाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.यात ...
आम्ही सारे शिवप्रेमी आयोजित तसेच वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, जिजाऊ ब्रिगेड संयोजित राज्यस्तरीय घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ...