Shiv Jayanti on behalf of Shiv Sena in Yeola | येवल्यात शिवसेनेच्या वतीने शिवजयंती

येवल्यात शिवसेनेच्या वतीने शिवजयंती

ठळक मुद्देशहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती

येवला : शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने तिथीप्रमाणे शिवजयंती कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साध्या पध्दतीने साजरी करण्यत आली.

शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात तालुका प्रमुख रतन बोरनारे, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी यांचे हस्ते शिवपुतळ्याचे पूजन केले गेले. प्रारंभी शहरातील टिळक मैदानातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सकाळी अभिषेक व पूजन करण्यात आले. या प्रसंगी भास्कर कोंढरे, दीपक भदाणे, राहुल लोणारी, किशोर सोनवणे, धीरज परदेशी, उत्तम घुले, रावसाहेब नागरे, नितीन संसारे , सचिन सोनवणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

 

Web Title: Shiv Jayanti on behalf of Shiv Sena in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.