सरपंचांची जनतेतून निवड करण्याचा निर्णय यापूर्वीच्या भाजपा शासनाने घेतला होता. पण महाविकास आघाडीने बहुमताच्या जोरावर हा निर्णय रद्द करून ग्रामपंचायत सदस्यांमार्फतच सरपंचांची निवड करण्याचा निर्णय घेतला. ...
राज्यात फडणवीस सरकारचा थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरे मंत्रिमंडळानं ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचांची निवड करण्याचा निर्णय घेतला. ...
रोहित्र नसल्यामुळे विद्युतपंप बंद असणे, गावातील पाईपलाईन दुरूस्त न करणे, हातपंपाची दुरूस्ती न करणे आदी कारणांवरून आमदार कैलास गोरंट्याल यांनी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ...
जनतेतून सरपंच निवडण्याचा कायदा कायम ठेवावा, अशा मागणीचा ठराव कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावच्या ग्रामसभेत करण्यात आला. हा ठराव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आला आहे. ...
सरपंच सेवा महासंघाचे राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यस्तरीय शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
आपत्तीला तोंड देण्यासाठी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पूरप्रवण गावातील सर्व सरपंच यांनी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी अभ्यासपूर्ण सहभाग द्यावा. ...