Spraying disinfectant from Sarpanch | सरपंचाकडून जंतुनाशक फवारणी

नांदूरटेक ग्रामपंचायत व चिंचबारी येथे कोरानाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतुनाशक फवारणी करताना सरपंच प्रभाकर ठाकरे.

चांदवड : तालुक्यातील नांदूरटेक ग्रामपंचायत व चिंचबारी येथे कोरानाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरपंच प्रभाकर ठाकरे यांनी स्वत: जंतुनाशक फवारणी केली. नागरिकांना घरात राहण्याच्या व घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. नांदूरटेक गावात जर कोणी पाहुणे आल्यास त्वरित ग्रामपंचायतीला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: Spraying disinfectant from Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.