नरेंद्र मोदींनी देशभरातील सरपंचांशी साधला संवाद; ग्रामीण भागांसाठी नवीन योजनांचे केले उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 12:39 PM2020-04-24T12:39:00+5:302020-04-24T12:45:46+5:30

नरेंद्र मोदी यांनी करोनाशी लढणाऱ्या ग्राम पंचायतींचे केले कौतुक, पुरस्कार प्राप्त सर्व प्रतिनिधींचेही कौतुक केले.

PM Narendra Modi interacts with sarpanches across the country mac | नरेंद्र मोदींनी देशभरातील सरपंचांशी साधला संवाद; ग्रामीण भागांसाठी नवीन योजनांचे केले उद्घाटन 

नरेंद्र मोदींनी देशभरातील सरपंचांशी साधला संवाद; ग्रामीण भागांसाठी नवीन योजनांचे केले उद्घाटन 

googlenewsNext

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील सरपंचांशी संवाद साधला. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी ई-ग्राम स्वराज्य वेबपोर्टलचे देखील उद्घाटन केले आहे. ई-ग्राम स्वराज्यवर ग्रामपंचायतीशी संबंधित सर्व योजनांची माहिती मिळणार असून हे मोबाईल अॅपवरही उपलब्ध असणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.

नरेंद्र मोदी यांनी करोनाशी लढणाऱ्या ग्राम पंचायतींचे केले कौतुक, पुरस्कार प्राप्त सर्व प्रतिनिधींचेही कौतुक केले. तसेच कोरोना संकटाच्या अनुभवातून आता आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल असं दिसून आले. स्वत: चा अवलंब न करता अशा प्रकारच्या संकटांना तोंड देणे कठीण होईल असं नरेंद्र मोदींनी सांगतिले.

कोरोना साथीने आपल्यासाठी बर्‍याच समस्या निर्माण केल्या आहेत, ज्याची आपण कधी कल्पनाही केली नव्हती. पण त्याहीपेक्षा या साथीने आपल्याला नवीन शिक्षण आणि संदेश दिला असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

Web Title: PM Narendra Modi interacts with sarpanches across the country mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.