डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 08:19 AM2024-05-27T08:19:34+5:302024-05-27T08:20:21+5:30

Vidhan Parishad Election Update: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच  मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक 26 जूनला होत आहे.

Niranjan Davkhare ticket cut off? Raj Thackeray, who supports the BJP for loksabha, has fielded a candidate Abhijeet panase for the Legislative Council Kokan Graduate constitiency | डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला

डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला

गेल्या काही वर्षांपासून कोणतीच निवडणूक न लढविणाऱ्या मनसेने यंदा भाजपला पाठिंबा देताना विधानसभेला जागा लढविण्याची घोषणा केली होती. त्याला यंदाच्या विधानपरिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीपासून सुरुवात केली आहे. राज ठाकरेंनी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. 

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच  मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक १० जून रोजी जाहीर करण्यात आली होती. परंतु ती दहा दिवसांपूर्वीच पुढे ढकलण्यात आली होती. शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. आता ही निवडणूक २६ जून रोजी होत आहे. विधानपरिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धवसेनेचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४  रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून अनिल परबांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष असलेले ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निव़णुकीत आता राज ठाकरेंच्या मनसेने उडी घेतली असून महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यामुळे डावखरेंचे तिकीट कापले गेल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम...
३१ मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे. शेवटची मुदत ७ जून ठेवण्यात आली आहे. अर्जाची छाननी १० जून, अर्ज माघारी घेण्यासाठी १२ जून आणि मतदान २६ जून रोजी घेतले जाणार आहे. तर मतमोजणी १ जुलै २०२४ रोजी घेतली जाणार आहे. 

Web Title: Niranjan Davkhare ticket cut off? Raj Thackeray, who supports the BJP for loksabha, has fielded a candidate Abhijeet panase for the Legislative Council Kokan Graduate constitiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.