मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 08:40 AM2024-05-27T08:40:49+5:302024-05-27T08:41:06+5:30

Malegaon Crime News: एमआयएमचे मलिक हे महानगर अध्यक्ष आहेत. मलिक यांच्यावर जवळून तीन गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते आहे.

Ex-mayor of Malegaon abdul malik shot at midnight; Three shots were fired in the hotel, Abdul Malik injured | मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी

मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी

मालेगावमध्ये खळबळ उडाली आहे. माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबलेले असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. यामद्ये अब्दुल मलिक हे गंभीर जखमी झाले असून शहरात तणावाचे वातावरण आहे. 

एमआयएमचे मलिक हे महानगर अध्यक्ष आहेत. मलिक यांच्यावर जवळून तीन गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मलिक हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गवरील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी तिथे मोटरसायकलवरून हल्लेखोर आले आणि जवळ जात त्यांच्यावर गोळीबार केला. मलिक यांना गोळ्या लागल्याचे दिसताच हे हल्लेखोर फरार झाले आहेत. मलिक यांच्या हात-पायाला आणि छातीजवळ गोळ्या लागल्या आहेत. 

मलिक यांना तीन गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत असून त्यांची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्यांना नाशिकला हलविले आहे. या घटनेनंतर मालेगावमध्ये तणावाचे वातावरण पसरले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी हल्लेखोरांचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे. 
 

Web Title: Ex-mayor of Malegaon abdul malik shot at midnight; Three shots were fired in the hotel, Abdul Malik injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.