गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 08:18 AM2024-05-27T08:18:49+5:302024-05-27T08:23:53+5:30

Shehnaaz gill: गेल्या वर्षभरापासून शहनाज आणि गुरु रंधावा यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. यावर, गुरुने त्यांच्या नात्याचं सत्य सांगितलं आहे.

guru-randhawa-reaction-on-dating-rumors-with-shehnaaz-gill-saif-maja-aa-raha-hai | गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'

गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'

bigg boss 13 मुळे प्रचंड लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गील (shehnaaz gill). मस्तीखोर अंदाज आणि लोभसवाणा चेहरा यांच्या जोरावर शहनाजने आज लाखो तरुणांची मनं जिंकली. परंतु, अनेकांच्या मनावर राज्य करणारी शहनाज इंडस्ट्रीमधीलच एका सेलिब्रिटीला वर्षभरापासून डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या वर्षभरापासून शहनाज, पंजाबी गायक गुरु रंधावाला (guru randhawa) डेट करत असल्याची चर्चा आहे. या चर्चांवर आता गुरु रंधावाने मौन सोडलं असून त्यांच्या नात्याचं सत्य सांगितलं आहे.

अलिकडेच गुरु रंधावाने 'हिंदुस्तान टाइम्स'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने शहनाजसोबत असेलल्या नात्याचं सत्य सांगितलं. त्यांच्या या वक्तव्याची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगलीये. मध्यंतरी शहनाज आणि गुरु यांचं एक गाणं रिलीज झालं होतं. या गाण्यात त्यांची जबरदस्त केमिस्ट्री दिसून आली होती. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. यावर, गुरुने स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाला गुरु रंधावा?

"जेव्हा लोक माझ्या डेटिंग लाइफविषयी चर्चा करतात त्यावेळी मला फार भारी वाटतं. जगभरातल्या सुंदर मुलींसोबत कायम माझे चाहते माझं नाव जोडत असतात. त्यामुळे मला मज्जा वाटते. प्रत्येक मुलाला असं अटेंशन हवं असतं", असं गुरु म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "लोकांनी अशीच माझ्या नावाची चर्चा करत रहावी. सध्या मी कोणालाही डेट करत नाहीये. पण, या चर्चांमुळे मी लवकरच कोणालातरी डेट करायला सुरुवात करेन. जर हा इंटरव्ह्यू कोणती मुलगी वाचत असेल तर तिच्यासाठी सांगतोय, की मी अजूनही सिंगलच आहे."

दरम्यान, एका म्युझिक व्हिडीओसाठी शहनाज आणि गुरु रंधावा यांनी एकत्र काम केलं होतं. या व्हिडीओनंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. इतकंच नाही तर एका इव्हेंटमध्ये त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं ज्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. गुरु रंधावापूर्वी शहनाजचं नाव राघव जुयालसोबत जोडलं गेलं होतं.

Web Title: guru-randhawa-reaction-on-dating-rumors-with-shehnaaz-gill-saif-maja-aa-raha-hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.