तालुक्यातील गोदावरी आणि पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी शेतातून रस्ता दिल्याच्या कारणाने मिठापूर सारंगी येथील चार शेतकऱ्यांच्या सातबारावर ६४ लाख रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे. ...
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने लोखंडी पाईप तोडल्याने पाईप का तोडला, असे विचारण्यास गेले असता वाद होऊन लाठ्या - काठ्यांनी दोन गावातील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ...
तालुक्यातील सुशी घाटातुन नियमाला डावलुन मोठया प्रमाणावर अवैध रेती वाहतुक केल्या जात आहे. या वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांची झोपमोड होत आहे. अवैध वाहतुक थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...
जिल्ह्यातील १३ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया तीन वेळा केल्यानंतरही हे वाळूघाट खरेदी करण्यासाठी कंत्राटदार फिरकले नसल्याने लिलाव रखडला आहे़ त्यामुळे या घाटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे़ ...
जिल्ह्यातील ९ वाळूघाटांमधून अधिकृत वाळू उपशाला सुरुवात झाल्याने खुल्या बाजारपेठेत वाळूच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
रमाई आवास योजनेंतर्गत शहरात १६०० घरकुलांना मंजुरी दिली असली तरी वाळू उपलब्ध नसल्याने केवळ ३६२ घरकुलं अंतिम टप्प्यात पोहचली आहेत. उर्वरित घरकुलांसाठी वाळूची अडचण सतावत असून महापालिकेचे उद्दिष्ट यावर्षी रखडले आहे. ...
अकोला : वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तहसील कार्यालय स्तरावरील गौण खनिज तपासणी पथके कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना शुक्रवारी दिले. ...