सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे. Read More
Sairat : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला, तरुणाईला वेड लावणारा, समाजातील सत्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या 'सैराट' चित्रपटाला रिलीज होऊन आज सात वर्ष झाली. ...
'सैराट' चित्रपटातील लहान पण दमदार सुमन अक्काच्या भूमिकेतून अभिनेत्री छाया कदम घराघरात पोहचली. सुमन अक्का या त्यांच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधले होते. ...
आर्चीची मैत्रीण आनीची भूमिका अनुजा मुळे (Anuja Muley) हिने साकारली होती. सैराटनंतर अनुजा कलाविश्वातून गायब झाली. त्यानंतर ती कोणत्याच प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. ...