'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची खऱ्या आयुष्यातील पत्नी सौंदर्यात देते नायिकांना टक्कर, पाहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 07:00 AM2023-07-21T07:00:00+5:302023-07-21T07:00:00+5:30

'सैराट' (Sairat Movie) चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका अभिनेता सुरेश विश्वकर्माने (Suresh Vishwakarma) निभावली आहे.

२०१६ साली रिलीज झालेला 'सैराट' (Sairat Movie) चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून जास्त गल्ला जमवला आहे.

सैराट चित्रपटातील आर्ची आणि परशाची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. या चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका अभिनेता सुरेश विश्वकर्माने (Suresh Vishwakarma) साकारली आहे.

सैराट चित्रपटातून आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारणारे सुरेश विश्वकर्मादेखील प्रसिद्धी झोतात आले.

सुरेश विश्वकर्माच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

सुरेश विश्वकर्माच्या पत्नीचे नाव विद्या विश्वकर्मा आहे.

सुरेश आणि विद्या यांना एक मुलगी असून तिचे नाव ओवी आहे.

अभिनेत्याची पत्नी विद्या दिसायला खूप सुंदर आहे.

सुरेश विश्वकर्मा यांनी लोकनाट्य प्रकारात मावशी, सोंगाड्यापासून वगातील सर्व मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विश्वकर्मा गावातून मुंबईत आले आणि त्यांच्या स्ट्रगलला सुरुवात झाली. या दरम्यान त्यांनी स्टेज शो, मालिका, चित्रपटांपासून ते अगदी पथनाट्यांमध्येही काम केले. पण, त्यांना खरी ओळख मिळाली ती नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटामुळे.

सुरेश विश्वकर्माने सैराट चित्रपटाशिवाय रेगे, महिमा खंडोबाचा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटात झळकले आहेत.