पहिल्यांदाच बोल्ड झाली 'मन धागा धागा'ची आनंदी; वन शोल्डर ब्लाउजमध्ये शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 03:22 PM2024-05-03T15:22:54+5:302024-05-03T15:26:41+5:30

Divya Pugaonkar: सध्या सोशल मीडियावर दिव्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ती पहिल्यांदाच बोल्ड अंदाजात दिसून येत आहे.

'मुलगी झाली हो' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar).

सध्या दिव्या 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेत काम करतांना दिसत आहे. या मालिकेत तिने आनंदी ही भूमिका साकारली आहे.

दिव्या सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते.

दिव्याने गुलाबी साडीतला काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने गुलाबी रंगाच्या साडीवर वन शोल्डर डार्क गुलाबी ब्लाउज परिधान केला आहे.

दिव्याने हलका मेकअप आणि केस मोकळे सोडले आहेत. लूक पूर्ण करण्यासाठी हातात तिने लाल रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत.

दिव्या पुगावकरने 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेआधी मुलगी झाली हो, प्रेमा तुझा रंग कसा आणि विठुमाऊली या मालिकांमध्ये काम केले आहे.