१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
Riyazuddin Kazi aide of Sachin Vaze arrested : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर एनआयएने काझी यांची चौकशी सुरु केली होती. ...
प्रदीप शर्माचा हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाने वाझेला पोलीस दलात घेण्यासाठी थेट संपर्क साधला होता. मात्र सचिन वाझेवर कोर्टात सुनावणी सुरू आहे असं सांगत भाजपा नेतृत्वानं ही शिफारस अमान्य केली ...
Udayanraje bhosale : आपल्या कटोऱ्यात जमा झालेले पैसे प्रशासनाकडे सुपूर्द करून उदयनराजेंनी कठोरपणे प्रशासनावर टीका केली. कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडॉऊन हा एकमेव पर्याय आहे, असे कुठला तज्ञ सांगतो ...
Home Minister : कोरोनामुळे सर्व पोलीस फौजफाटा रस्त्यावर, फिल्डवर आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, हे पोलिस दलाचे काम आहेच, परंतु कोरोना काळात राज्य सरकारने घातलेल्या बंधनांची अंमलबजावणी करणे हीदेखील जबाबदारी पोलिसांवर आहे. ...
sachin Vaze sent to Taloja Jail : कोर्टाने म्हटले आहे की, ऑफिसला जा आणि तेथे कोणती कागदपत्रे आहेत ते पहा आणि एनआयए त्यांना जे पाहिजे आहे त्यामध्ये मदत करा. ...