Sachin Vaze : सचिन वाझेंचा सहकारी रियाजुद्दीन काझी यांना NIA केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 12:14 PM2021-04-11T12:14:56+5:302021-04-11T12:15:57+5:30

Riyazuddin Kazi aide of Sachin Vaze arrested : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर एनआयएने काझी यांची चौकशी सुरु केली होती.

Riyazuddin Kazi aide of Sachin Vaze arrested by National Investigation Agency relation with Ambani bomb Scare | Sachin Vaze : सचिन वाझेंचा सहकारी रियाजुद्दीन काझी यांना NIA केली अटक 

Sachin Vaze : सचिन वाझेंचा सहकारी रियाजुद्दीन काझी यांना NIA केली अटक 

Next
ठळक मुद्देसचिन वाझे याचा सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी यांना एनआयएने कटात सामील असल्यामुळे आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका बजावल्यामुळे अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

सचिन वाझेंचे सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी यांना NIA कडून अटक करण्यात आली आहे. अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरण प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. काजी यांची अनेक वेळा एनआयए अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर एनआयएने काझी यांची चौकशी सुरु केली होती. सचिन वाझेंच्या अटकेनंतर रियाजुद्दीन काझी एनआयएच्या रडारवर आले होते. 

सचिन वाझे याचा सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी यांना एनआयएने कटात सामील असल्यामुळे आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका बजावल्यामुळे अटक केल्याची माहिती समोर येत आहे. रियाजुद्दीन काझी हे २०१० च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहेत. काझी २०१० सालच्या १०२ व्या बॅचमधील अधिकारी आहेत. पोलीस दलातील काझी यांची सगळ्यात पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशन करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची दुसरी पोस्टिंग अँटी चेन स्नॅचिंग विभागात करण्यात आली.

पीएसआयवरून एपीआय पदावर प्रमोशन झाल्यानंतर काझी यांची तिसरी पोस्टिंग मुंबई पोलिसांच्या सीआययु पथकात करण्यात आली. ९ जूनला सचिन वाझेंनी सीआययु पथकाचे इंचार्ज म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून काझी हे सचिन वाझे यांच्यासोबत काम करत होते. वाझे यांच्याशी चांगले संबंध असणारा अधिकारी म्हणून काझी यांची ओळख आहे.

 

काझी यांची सशस्त्र पोलीस दलात बदली केली होती
सचिन वाझे यांच्यासोबत कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी आणि प्रकाश ओव्हाळ यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशी करत आहे.  काझी यांची सशस्त्र पोलीस दलात तर ओव्हाळ यांची मलबार हिल पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती.

Web Title: Riyazuddin Kazi aide of Sachin Vaze arrested by National Investigation Agency relation with Ambani bomb Scare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.