सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला. Read More
सचिन पायलट यांच्या प्रस्तावित धरणे आंदोलनावर तीव्र आक्षेप घेत राजस्थान काँग्रेसने म्हटले आहे की, विद्यमान सरकारच्या विरोधात असे कोणतेही आंदोलन पक्षविरोधी कृती मानले जाईल. ...
Lokmat Parliamentary Awards 2022 : सचिन पायलट हे भाजपामध्ये जाणार असल्याचीही चर्चा सुरू असते. दरम्यान, याबाबत भाजपाचे नेते सुधांशू त्रिवेदी यांना विचारले असता त्यांनी सूचक असं उत्तर दिलं आहे. ...
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, “भारत जोडो यात्रेचा संदेश देशभरात पोहोचला आहे. सत्ताधारी पक्ष भाजपला टीका आवडत नाही. टीका केलीत तर तुरुंगात जा. लाखो लोक आमच्या प्रवासात सामील होत आहेत.” ...