सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला. Read More
मिझोराममध्ये १९६६ मध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात सचिन पायलट यांच्या वडिलांचाही हात असल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केला होता. याला सचिन पायलट यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ...
खरे तर राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या समेट घडवून आणल्यानंतर, गुज्जर समुदायाला आकर्षित करणे, हे काँग्रेससाठी मोठे आव्हान असणार आहे. ...
Congress: राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत आहेत. भूपेश बघेल यांच्यासारखाच हादेखील ओबीसी चेहरा आहे. त्यामुळेच सचिन पायलट आपल्याच सरकारवर जाहीर टीका करत आहेत. कथित भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत आहेत. टीएस बाबांना दिलासा देण्य ...