Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ram mandir, Latest Marathi News
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
मोझरी येथील पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानातील राममंदिरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामाचे पूजन करून राममंदिर पायाभरणीबाबत जल्लोष केला. अयोध्या येथील राम मंदिराच्या पायाभरणीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील ...
भंडारा शहरातील प्रत्येक चौक भगव्या पताकांनी सजविण्यात आले होते. चौकाचौकांत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. येथील गांधी चौकात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भंडार ...
चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेटपासून बाजार चौकापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री मुख्य चौकात आणि नगरातील दोन राम मंदिरांसह सर्व मंदिरांमध्ये १०८ दिवे लावण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह रामभक्तांनी चौकात प्रभू रामचंद्राचे मोठे कटआ ...
चंद्रपुरातील शहरासह जिल्ह्यातील सर्व गावांमधील राम मंदिरात बुधवारी पूजा-अर्चना करण्यात आली. यासोबतच सायंकाळी सर्व मंदिरात दिवे लावून रोषणाई करण्यात आली. ब्रह्मपुरी येथे लाडूचे वितरण, घुग्घुस व नकोडा येथे मसालेभाताचे वितरण करण्यात आले. याशिवाय भाजपा क ...