जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पाऊस बरसला. कळंब येथील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जिनिंगला रात्रीच्या सुमारास वीज कोसळून आग लागल्याचे सांगितले जाते. या आगीत सुमारे २ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...
काल मंगळवारनंतर आज दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसासह गारपीटीने जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मळणी केलेले धान पिकांचे पोते पावसात भिजले तसेच रब्बी पिकाचे व बागायत शेतीचे प्रचंड नुकसान झाले. ...
मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. काही ठिकाणी अनेक घरांचे कौल व पत्रेदेखील उडून गेले. ...
विदर्भात तुरळक ठिकाणी धुके नोंदविण्यात आले आहे. विदर्भ व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. ...
काही ठिकाणी बोराच्या वा हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. एके ठिकाणी वीज पडून २५ बकऱ्यांचा मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यात एका शेतकरी तर भंडारा जिल्ह्यात एक बालक वीज काेसळून मरण पावले. ...
जिल्ह्यात सकाळपासून धुके अन् ढगाळ वातावरण होते. दुपारी मात्र, काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला यामध्ये अचलपूर्- परतवाडा व मोर्शी तालुक्यात अंबाडा येथे हरभऱ्याएवढी गार पडली. यामुळे संत्र्याचे फळाला मार लागल्याने फळगळ होण्याची शक्यता आहे. ...
यवतमाळ शहरात मंगळवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास अवकाळी पावसास सुरुवात झाली. याच वेळी बाभूळगाव, नेरसह, वणी, मारेगाव, कळंब तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. बाभूळगाव तालुक्यातील गणोरी, आलेगाव, अंतरगाव, दिघी, मुस्ताबाद, वाटखेड, नायगाव, कृष्णापूर, ...