एसटी संपाचा खासगी ट्रॅवल्सना चांगलाच फायदा झाला आहे. संपकाळात भंडारा- नागपूर मार्गावर ट्रॅव्हल्सच्या संख्येत चारपटीने वाढ झाली आहे. प्रवाशांनाही नाईलाजाने खासगी वाहनातून प्रवास करावा लागताे. तिकिटाचे दरही दुप्पट करण्यात आले आहेत. ...
गोंदिया-बल्लारशा मार्गावर सध्या केवळ सकाळी ७.३० वाजताची एकच पॅसेंजर गाडी सुरू आहे. या रेल्वे मार्गावरील इतर फेऱ्या आजही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटी बसची प्रवासी वाहतूक बंद आहे नेमका याचाच फायदा घेत स्थानिक व परिसरातील दारुड्यांसह इतर असामाजिक तत्त्वांनी धापेवाडा येथील बसस्थानकात त्यांचा अड्डा तयार केला आहे. ...
भंडारा पवनी लहान-लहान खासगी वाहने, टाटा सुमो आणि इतर गाड्या सुरू आहेत. यातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा भरणा करून त्यांची ने-आण केली जात आहे. तर, तिकीटांचे बघायचे झाल्यास लोकांकडून प्रवासाचे दुप्पट दर घेतले जात आहेत. ...
२ नोव्हेंबरपासून साकोली, भंडारा आणि पवनी आगारातील कर्मचारी संपावर गेले आहेत. गत १७ दिवसांपासून एसटीची बससेवा बंद आहे. त्यामुळे दररोज सरासरी ४५ लाखांचे नुकसान होत असून, आतापर्यंत तब्बल ८ कोटी रुपयांचा फटका महामंडळाला बसला आहे. ...