प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत. Read More
पेन्शनरांचे पेन्शन वाढवून महिना किमान तीन हजार रुपये करण्याच्या भगतसिंग कोश्यारी समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याच्या निवडणूक आश्वासनाचा सत्ताधारी पक्षास पुरता विसर पडला आहे. ...