राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
"हे सरकार लोकांचे आहे. मी नेहमीच सांगतो, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, गोरगरिबांचे सरकार आहे, शेतकऱ्यांचे आहे, कष्टकऱ्यांचे आहे, माझ्या माता-भगिनींचे आहे, माझ्या बांधवांचं आहे, युवकांचे आहे, ज्येष्ठांचे आहे, वारकऱ्यांचे आहे, सर्वांचे आहे." ...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील राबवलेले उपक्रम राज्यभर राबवणार अशी घोषणा केली. ...