मेशी : तालुक्यातील देवपूरपाडे येथील चिंचमळा शिवारात युवकाने कुºहाडीने वार करून महिलेचा खून केल्याची घटना घडली आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य युवकाने त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने केल्याचे समजते. ...
पाटणे : परिसरात यावर्षी निसर्ग वादळापासून दररोज थोड्याफार प्रमाणात पाऊस बरसत असल्यामुळे तसेच पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची खरीप पिकांच्या पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. ...
ओझर : येथील सेवागीर गोसावी हे शुक्रवारी (दि. १२)ओझर मर्चण्ट बँकेत कामानिमित्त आले असता येथे त्यांच्या खिशातील पाकीट खाली पडले. काम आटोपल्यानंतर गोसावी घरी निघून गेले. ...
नाशिक : शहर विकास आराखड्यातील विविध शासकीय खात्यांसाठी आरक्षित भूखंडाचा महापालिकेने विनाकारण टीडीआर दिल्याच्या घटना उघड झाल्यानंतर नगररचना विभागाच्या विविध अधिकाऱ्यांवर संशय बळावला आहे. महापालिकेचे दायित्व नसताना मोबदला दिलाच कसा? असा प्रश्न स्थायी स ...
इंदिरानगर : महावितरणकडून इंदिरानगर परिसरात होणारा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने या भागात विजेचा नेहमी लपंडाव सुरू असतो. त्यामुळे नागरिकांची घरघुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून, अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिकही त्रस्त झाले असून, या भागा ...
नाशिक : गत शतकापेक्षाही अधिक काळापासून गोदाकाठावर बसणारा भाजीबाजार कोरोना लॉकडाऊननंतर कायमस्वरूपी इतिहासजमा झाला आहे. आता बहुतांश भाजीविक्रेते त्यांना निर्धारित करून दिलेल्या गणेशवाडीतील भाजीबाजारातच दुकान मांडून बसू लागले आहेत. ...
नाशिक : शहर व परिसरात शुक्रवारी (दि.१२) दुपारी मान्सून सरींनी जोरदार सलामी दिल्याने लॉकडाऊन व संचारबंदीतून बाहेर पडून सुरुळीत होऊ पाहणारे जनजीवन काहीकाळापुरते का होईना विस्कळीत झाले. हवामान खात्याकडून रविवारपासून जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होईल, असा अं ...
नाशिक : शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने गोदावरीचे पात्र दुपारीच ओसंडून वाहू लागले. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही काठांवरील मोकळ्या जागेत लावण्यात आलेली काही वाहने नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागल्या. ...