दारणाकाठालगत पिंजऱ्यांची तटबंदी : मोहगाव पांडव टेकडीवर बिबट जोडीचे दर्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 04:51 PM2020-06-29T16:51:05+5:302020-06-29T17:06:11+5:30

रविवारी रात्री मोहगावच्या लगत असलेल्या पांडव डोंगरावर व पाटाच्या परीसरातील घनदाट झाडीत बिबट जोडी मुक्त संचार करताना....

Bibat couple's darshan on Mohgaon's Pandav hill! | दारणाकाठालगत पिंजऱ्यांची तटबंदी : मोहगाव पांडव टेकडीवर बिबट जोडीचे दर्शन !

दारणाकाठालगत पिंजऱ्यांची तटबंदी : मोहगाव पांडव टेकडीवर बिबट जोडीचे दर्शन !

Next
ठळक मुद्देबोरिवलीचे रेस्क्यू पथक पुन्हा नाशकातभीतीपोटी गावक-यांची रात्रीची झोप उडाली बिबट्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

नाशिक : नाशिक तालुक्यातील पुर्व भागात दारणानदीकाठालगतच्या बाभळेश्वरपासून तर थेट दोनवाडेपर्यंत बिबट्याची दहशत मागील महिनाभरापासून कायम आहे. या भागात सातत्याने बिबट्याकडून लहान मुलांवर हल्ले झाल्याने नागरिक भयभीत झाले आहे. वनविभागाकडून संपुर्ण दारणाकाठालगत पंधरा ते वीस पिंजऱ्यांची जणू तटबंदीच करण्यात आली आहे; मात्र अद्याप बिबट्या जेरबंद झालेला नाही. बिबट्याचा माग काढून त्याला पिंज-यात जेरबंद करणे अथवा बेशुध्द करण्यासाठी बोरिवलीच्या पथकाची अतिरिक्त मदत पुन्हा घेण्यात आली आहे.
सामनगाव येथील पोलीस पाटील मळ्यात रविवारी (दि.२८) संध्याकाळी बिबट्याने ओम कडभाने या चार वर्षीय मुलावर झडप घातली. आजोबा बबन जगताप यांच्यासह गावक-यांनी आरडाओरड करत बिबट्यामागे धाव घेतली. यामुळे सुदैवाने बिबट्याने ओमला जबड्यातून सोडून देत धूम ठोकली. या घटनेत ओमचे प्राण बालंबाल बचावले. बारा दिवसांपुर्वीच या गावापासून जवळच दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बाभळेश्वरमध्ये गुंजन नेहेरे या तीन वर्षीय बालिके चा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.


रविवारी रात्री मोहगावच्या लगत असलेल्या पांडव डोंगरावर व पाटाच्या परीसरातील घनदाट झाडीत बिबट जोडी मुक्त संचार करताना ग्रामपंचायत सदस्य सुरेश टिळे, संपत टिळे, सुदर्शन टिळे, साहेबराव टिळे, वैभव टिळे आदिंच्या नजरेस पडली. त्यांनी गावकºयांच्या मदतीने बॅटरीच्या प्रकाशात बिबट्यांना हुसकावून लावले. बिबटे साबराच्या आडोशाने दाट झाडीत पसार झाले. मात्र भीतीपोटी गावक-यांची रात्रीची झोप उडाली या भागातील बिबट्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी उपसरपंच सचिन जगताप, पंचायत समिती सदस्य अनिल जगताप यांनी केली आहे.

 

Web Title: Bibat couple's darshan on Mohgaon's Pandav hill!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.