नाशकात १ जूलैपासून नववी, दहावी, बारावीचे ऑनलाईन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 06:02 PM2020-06-29T18:02:28+5:302020-06-29T18:04:00+5:30

लाकॅडाऊन अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये नववी, दहावी व बारावीसाठी १ जुलैपासून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याची तयारी सुरू आहे. नाशिकमधील एचपीटी,आरवायके, बीवायके सारख्या महाविद्यालयांमध्ये १२ वीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली असून १ जूलैपासून नियमितपणे ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात येणार आहे.

Online education for ninth, tenth and twelfth classes in Nashik from tomorrow | नाशकात १ जूलैपासून नववी, दहावी, बारावीचे ऑनलाईन शिक्षण

नाशकात १ जूलैपासून नववी, दहावी, बारावीचे ऑनलाईन शिक्षण

Next
ठळक मुद्देबारावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ७० ते ८० टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया सुरूच राहणार

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लाकॅडाऊन अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर सध्या राज्यातील सर्व शाळामहाविद्यालयांमध्ये नववी, दहावी व बारावीसाठी १ जुलैपासून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याची तयारी सुरू आहे. नाशिकमधील एचपीटी,आरवायके, बीवायके सारख्या महाविद्यालयांमध्ये १२ वीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली असून १ जूलैपासून नियमितपणे ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध शिक्षण सस्थांकडून नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासह कोणत्याही शैक्षणिक कामासाठी बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिकमधील विविध महाविद्यालयांनी बारावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली असून जवळपास ७० ते ८० टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रि या सुरूच राहणार असल्याचे कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय प्रशासनांकडून सांगण्यात येत आहे. मात्र याविषयी शिक्षण विभागाकडे संकलित स्वरुपाची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्यानेच समोर आले आहे. जुलैपासून शक्य त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याच्या सुचना सरकारने दिल्या आहेत. हे आदेश तसेच्या तसे पुढे पाठविण्यापलिकडे शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. शहरासह जिल्हयातील किती महाविद्यालयांध्ये बारावीसाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली, किती शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची तयारी करण्यात आली आणि किती विद्यार्थी प्रत्यक्ष ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत सहभागी होणार आहेत याविषयी माध्यमिक शिक्षण विभाग अनभिज्ञ असल्याने स्थानिक शिक्षण विभाग व शिक्षणाधिकारी शासनाकडून येणारे आदेश पुढे पाठविणारे टपालखाते बनले आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन 
गोखले एज्युकेशन संस्थेच्या शहरी भागातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या प्रवेशप्रक्रिया दि. १० ते ३० जून २०२० या कालावधीत राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे १ जुलैपासून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या सुचनांप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकविण्याची पूर्वतयारी संस्थेने केली असल्याची माहिती संस्थेच्या मानव संसाधन संचालक  प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे यांनी दिली.  

Web Title: Online education for ninth, tenth and twelfth classes in Nashik from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.