नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सत्तापक्षाने पुन्हा एकदा आयुक्त तुकाराम मुंढे यांची कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे. १० जुलैला संचालक मंडळाची बैठक होत आहे. ...
नागपुरातही रॅपिड अॅण्टिजेन चाचणीला मंगळवारपासून सुरूवात झाली. १५ मिनिटात कोरोना पॉझिटिव्ह अहवाल उपलब्ध झाल्याने मंगळवारी ७१ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या १,८६५ वर पोहचली. यात भांडेवाडी येथील रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या २७ झाली. ...
शिवसेना नेत्याच्या खुनाच्या गुन्ह्यात गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. वकिलाचा युक्तीवाद मान्य करत गवळीला खंडपीठाने 28 दिवसांचा फर्लो मंजूर केला आहे. ...
निवास व्यवस्था असणारी हॉटेल जवळपास साडेतीन महिन्यानंतर बुधवार, ८ जुलैपासून सुरू होणार आहे. ग्राहकांची काळजी, नियमांचे पालन, सॅनिटायझेशन, मास्क, ग्लोव्हज आदींचा वापर करून आणि एकूण क्षमतेच्या ३३ टक्के उपयोग करूनच हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. ...
नवीन रेशनकार्ड बनविण्यावरून नागरी अन्न पुरवठा विभागात सध्या सावळागोंधळ सुरू आहे. लॉकडाऊनदरम्यान नवीन रेशन कार्डधारकांच्या ऑनलाईन आधार लिंकिंगच्या प्रक्रियेत विभागाचा मनमानी कारभार सुरू असून, त्याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे. ...
ऑड-इव्हन आणि वेळेचे बंधन दुकानदारांवर का, असा सवाल करीत ही बंधने दूर करून शासनाने सकारात्मक वातावरणात व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केली. ...
शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रात दररोज वाढ होत आहे. मंगळवारी यात पुन्हा ८ क्षेत्रांची भर पडली. तर एका परिसराची व्याप्ती कमी करण्यात आली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. ...
२२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासंबंधी येत्या २० जुलैपर्यंत महाराष्ट्र शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही गणेशमूर्ती चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात, असे आवाहन केले आहे. ...